प्रेम कथा

हिरवा चुडा-भाग १

आईने हिरव्या बांगड्या घातल्या कि रेणूचे प्रश्न सुरु व्ह्ययचे, “आई, लग्नात हिरवा चुडा का घालतात? मी कधी घालणार? आणि हा काचेचाच का असतो?”

आई तिचा पापा घेवून तयार करायची, आणि म्हणायची, “हिरवा चुडा सौभाग्यच प्रतीक असतं, लग्नाच्या उंबरठयावर, लग्नात, आणि सर्वच समारंभात स्त्रिया हा  चुडा सौभाग्याचं लेणं म्हणून घालतात. तू लहान आहेस, शहाणी झाली कि आपण तुझ्यासाठी छोटासा घरच्या घरी कार्यक्रम करू, मग मी तुलाही घालायला देईल हा हिरवा चुडा “

आणि रेणू परत प्रश्न करायची, “आई शहाणं कधी होतात मला लवकर व्ह्ययच आहे “

मग बाबा अलगत कडेवर घेत म्हणायचे, “अरे बापरे .. माझ्या रेणूला शहाणं व्हायचं आहे .. पण माझं बाळ तर खूप शहाणं आहे.. “

मग रेणू लाडात येत, “बघ ना बाबा आई मला म्हणती कि मी शहाणी नाही .. आणि माझ्या मापाचा हिरवा चुडा नाही देत मला .. हा गुलाबी प्लास्टिक चा नको मला .. “

रेणू १३ वर्षाची होती तेंव्हा तिला महावारी सुरु झाली आणि घरात तिच्यासाठी कार्यक्रम होता, तिच्या मामाने, भाचीसाठी सोन्याची  तोरडी आणली होती, ती तोरडी आणि हिरवा चुडा घालून सर्व घरात रेणू ठुमकत होती. आता बाबांच्या वागण्यात थोडा बदल झाला होता, येत जाता रेणूला उचलणारे बाबा फक्त डोकयावर लाडाने हात ठेवायचे आणि रेनूलाही आता पोंगाळी अवस्था भिडली होती. हुशार होती मग अभ्य्सात काही काळासाठी हिरव्या चुड्याला विसरली, पण तारुण्याच्या उंबरठयावर परत हिरव्या चुडायची तिला भुरळ पाडली, आईसोबत बाहेर जात्ताना, लग्नात आणि समारंभात साडी नेसून हिरव्या बांगड्या घालून मिरवणं तिला भारी आवडायचं. तिच्या नाजुकश्या हातावरचा हिरवा चुडा तिलाच तिच्या मोहात पाडायचा.. एकटीच रमायची त्या बांगड्यांच्या आवाजात.. आणि बाबा तिला ये वेडाबाई असं म्हणायचे. 

कॉलेजात असतांना तिची भेट रितेश शी झाली, त्याला ती खूप आवडायची पण रेणूने त्याला कधीच जवळ केलं नाही, त्याला ती मैत्रीच्या भावानेच वागवायची. पुढे दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री झाली .. कॉलेज आणि घरी सर्वानाच वाटायचं कि ते दोघे लग्न करणार.

रेणू मस्त नटून थाटून आईसोबत लग्नाला गेली होती तेव्हा तिची नजर रंजितवर खिळली आणि त्याचा रुबाब आणि बोलण्याची पद्धत खूप तिला आवडली, त्या लग्नातच ती त्याच्याशी बोलण्याचे बहाणे शोधात राहील. रंजितच्या ते लक्षात आल आणि त्याने तिला समोरून जावून विचारलं, “लग्न करणार का ह्या पायलटशी?” 

आणि मग रंजित स्वतःहून घरच्यांन सोबत तिच्या घरी तिला मागणी घालायला पोहचला. रंजित वायुसेनेत पायलट होता आणि महिन्या भाराच्या सुटीवर घरी आला होता. त्याच्याही घरी मुली बघणं सुरूच होत मग त्याच्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता. रेणूच्या आईला मात्र महिन्या भरात लग्न काढणं पटत नव्हत, पण रेणूच्या हट्टापुढे कुणाचच चाललं नाही आणि तिने त्याच्या नावाचा हिरवा चुडा घातला. लग्न होवून वीस दिवस झाले होते आणि रंजितला आता परत सेनेत रुजू व्हायचं होत. तो तिला म्हणाला, “तुझा हा हिरवा चुडा जुना होईपर्यंत मी परत येतोच, बस…हा गेलो आणि हा आलो .. लग्नाच्या सुट्या असतात आम्हाला त्या घेऊन लगेच महिन्या भरात येतोच, तुझ्यासाठी नवीन हिरवा चुडा घेवून..ह्या हिरव्या चुड्याची खण खण माझ्या हृदयाला तुझ्याजवळ ओढून लवकरच आणेल.. .. तू तुझं कॉलेज सुरूच ठेव.”

रेणू सासरी होती तरीही तिने कॉलेज सुरु केलं, रंजितशी रोज बोलणं होतच होत आणि घर, कॉलेज चा अभ्यास सगळं सुरळीत सुरुच होत .. रंजितला जावून महिना झाला होता. तो आता सुट्या घेवून परत येणार होता .. तोच त्याला गोड बातमी त्याच्या आईकडून कडली.. रेणू आई होणार होती. रंजितच्या आईला तीच खूपच कौतुक होत. तिला बारा वर्षाने रंजित झाला होता पण रेणूला महिन्यभरात दिवस गेले होते. सुनेला इथे ठेवू कि तिथे असं झालं होत त्यानां. रंजितलाही आता रेणूला भेटण्याचे वेध लागले होते..

त्या दिवशी त्याची घरी जाण्याची पूर्ण तयारी झाली होती आणि शेवटची शिफ्ट संपली कि तो निघणार होता.. त्याचा विमानाचा शेवटचा राऊंड करायला निघाला .. आणि परतच आला नाही .. वायुदलाने बराच शोध घेतला पण रंजितच विमान वायुदलाच्या कुठल्याच दिशेत दिसत नव्हतं .. सर्व रडार सिस्टिम चेक करून झाली होती .. कुठेच विमान अपघात दिसत नव्हता .. शेवटी वायुसेनेने त्याला मृत घोषित केलं आणि त्याच सामान त्याच्या ऐवजी घरी आलं .. ज्या सामनात सर्वात वरती होता तो हिरवा चुडा …

रंजितचा खरंच मृत्य झाला का ? रेणू रंजितला विसरणार ? भेट आणि लग्न तर एका महिण्याचच होत .. आयुष्यभर राहील .. रेणूच्या बाळाचं काय झालं .. पुढे रेणूला आयुष्यात हिरवा चुडा घालायला भेटलं!!!… वाचायला विसरू रेणूच्या स्वतःच्या संघर्षाची आणि अतूट विश्वासाची कहाणी ….

पुढचा भाग … लवकरच मनांतल्यातळ्यात FB पेजवर

पुढ्च्या भागासाठी मला फोल्लोव करायला विसरू नका. माझा प्रत्येक लेख वाचण्यासाठी मनापासून धन्यवाद!!

कथा सत्य घटनेशी प्रेरित होऊन लिहिल्या गेली असली, तरी वास्तवात ह्या कथेचा कुणाच्याही सत्य घटनेशी संबंध नाही .. असं वाटल्यास तो योगायोग समजावा ..

धन्यवाद!!

कथा आवडल्यास पुढच्या भागासाठी तुम्ही इथे लाईक किंवा फॉलो करू शकता
Facebook Comments

You may also like...