नाते संबन्ध, प्रेम कथा, मनातल्या कथा

द व्हर्चुअल रिलेशनशिप!

राजन ऑफिस मधून आलेला, जरा फ्रेश झाला आणि सोफयावर बसला, तिथेच जवळ असलेल्या सॉकेट मध्ये त्याने मोबाईलचा चार्जिंग केबल लावला. मोबाईल हातात घेतला, पासवर्ड टाकता टाकता त्याने रंजनाला आवाज दिला,

“रंजू आज चहा मिळणार ना? एव्हाना घेऊन येतेस आज काय आम्ही असच बसायचं.”

“अहो ठेवला होता पण दूध फाटलं, जाता का जरा समोरच्या दुकानात, घेऊन या ना, बाळ पण आज राहत नाही आहे. मला जमणार नाही हो. ”

“हे काय, थकलो ग मी , मी नाही जात तूच जा. ठेव त्याला काही वेळ इथे खाली. बघेन मी. ”

असं म्हणून त्याने मोबाईलमध्ये डोकं घुसवलं, समोरून कुण्या मुलीचा मॅसेज होता,

“हाय, How r u? ”

[the_ad id=”13207″]

हॅलो, मी fine”

“मी बोअर होत आहे”

“मग काय करायचं? ”

“तू तुझा मस्त सेक्सी फोटो पाठव ना, मन फ्रेश होईल.”

राजनने मस्त स्वतःचा फोटो काढला आणि पाठवला.

राजन, “आता तू तुझा पाठव ना! ये टॉप काढून पाठव. ”

“हो हो .. माहित आहे मला .. ”

तिने फोटो काढून पाठवला.

“बाबारे, दिल खाल्लंस झालं यार .. मस्ती चढली. गुर्मी चढली यार.”

तेवढ्यात समोर खेळत असलेला रुद्र रडायला लागला, राजनच लक्ष जरा मोबाईल वरून दूर झालं, जरा तजेला झाला होता, मुलाचा लाड करत त्याने त्याला उचललं, रंजूही घरात शिरली होती, मुलाला असं राजनने घातलेलं बघून जरा सुखावली, थोडी स्मित हसत ती दोघाकडे बघत स्वयंपाक घरात गेली. चहा करतांना ती गाणं गुणगुणत होती,

“घरात हसते तारे असता मी कशाला पाहू नभाकडे. ”

राजन स्वयंपाक घरात शिरला, बाळाला त्याने तिथल्या चटईवर टाकलं, जरा त्या

गुर्मीत होता, रंजूलाबघून कमालीची स्माईल दिली आणि परत सोफयाकडे वळला, मोबाईल उचलला आणि परत मग्न.

रंजूने चहा आणून ठेवला आणि ती बाळाच डायपर बदलायला गेली, नंतर ती बाळाचं करण्यात मग्न झाली. बाळाला झोपवलं नंतर तिने स्वयंपाक मांडला, हॉलमध्ये डोकवलं तर चहा तसाच टेबल वर ठेवून होता आणि राजन अजूनही मोबाईल मध्ये डोकं घालून बसला होता, त्याचे भाव क्षणां क्षणाला बदलत होते. नकळत शरीराच्या गुप्त भागावर हात जात होता आणि तो जरा हसत होता. रंजूला काहीस विचित्र वाटत होतं. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली,

“काय हो, चहा हवा होता ना? त्या चहा साठी मला किती खटपट करावी लागली.”

राजन, दचकला होता, “हो हो, नाही ग, जरा ऑफिस मधल्या मित्राला मदत हवी होती. मग सुरु होतं त्याला मॅसेंजर वर सांगणं, चहाचं भानच राहिलं नाही ग, आता घेतो, मी चहा थंडाच घेतो ना!”

रंजू त्याच्याकडे, रोखून बघत होती, तर तो म्हणाला, “ये तुला काय कळते मोबाईलचं किती काम होतं ह्याने. तू गावंडळची गावंडळचं राहणार, जा स्वयंपाक कर, भूक लागली आहे मला.”

रंजूला जरा वेळ आधीचा राजन आणि आताचा जरा वेगळाच भासला. तिला कळालं होतं कि तो काही ऑफिसचं काम करत नव्हता म्हणून. तसं तिने जावू दिलं कारण बाळ आतल्या खोलीत रडत होतं. पण काही केल्या तिच्या मनातून काही तो विचार जाई ना. जेवणं  झाली आणि परत राजन त्याच्या मोबाईल मध्ये डोकं खुपसून  बसला. तो दिवस आणि रात्र तशीच गेली. हळू हळू त्याच ते मोबाईल मध्ये बघून हसणं, घामाने चर्रर्र होणं आणि नंतर रंजूला झोपतांना ओढताड करत अंगावर लोळणं वाढत होतं. कधी रंजूला त्याच तिच्यासाठीचं प्रेम वाटायचं तर कधी जास्तच होत आहे हा हि आभास होत असायचा.

त्या दिवशी तिला त्याच्या वागणुकीची किळस आली आणि तिने चक्क त्याला अंगावरून खाली लोळलं, त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला, “ये भवाने समजतेस काय ग स्वतःला? मला काय कमी आहे बायकांची, अरे मरतात माझ्यावर आजही, तू काय लागली ग, जा हो बाजूला. कपडे घालण्याची तरा नाही कि बोलण्याची. गावठी कुठली.”

रंजूही भडकली होती, पण तिने राग मनातच कोंबला आणि गुमान मुलाला घेऊन झोपण्याचं नाटक करत राहिली.

राजन बेडरूम मधून निघून परत सोफयावर उलटा लोळला आणि सोशीअल मीडियावर मुलींशी बोलता बोलता त्याचा डोळा लागला.

त्याच्या हातून मोबाईल अलगत खाली पडला, त्या आवाजाने रंजू ताडकन उठून पहिल्या खोलीत आली, राजन ढाराढूर उताणा झोपला होता. तिने मोबाईल उचलला, एकदोन पासवर्ड टाकून पहिले पूर्वी त्याच्या आणि तिच्या फोनचा पासवर्ड सारखाच असायचा पण आता बदलला होता. तिने मुलाची जन्मतारीख टाकली आणि तो मोबाईल उघडला. तिच्या मनाला तेवढंच बरं वाटलं, वाटलं, निदान मुलावर तरी आहे ह्या माणसाचं प्रेम कायम.

तिने त्याचं फेसबुक मेसेंजर उघडलं आणि थक्क झाली, प्रत्येक मुलीला हाय हेलो, जेवण झालं का? काय जेविलीस? तुझ्याबद्दल काही अजून सांग ना?

अशे काही मॅसेज होते. काही मुलींना तर राजनने स्वतःचे फोटोही पाठवले होते आणि काही मुलींचे फोटो पाहून ती स्वतः लाजून गप्प नि चुप्प झाली होती. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, हि सवय राजनला लागली कशी ? तो तर असा नव्हता, तीच मन उत्तर शोधत होतं, मनात विचारांचा धिंगाणा सुरु होता, मी प्रेगनंट होते तेव्हा तर ह्यांना एकटेपणा जाणवला असणार, कि मी माहेरी होते तेव्हा, कि मी मुलात गुंतले म्हणून, ह्यांचा हा टाईम पास आहे कि वेड लागलाय. कि रिलेशनशिप शोधत आहे. बरं नाही हे, मुलगा आहे, संसार आहे उगाच काही झालं तर. तिची नजर परत मोबाईलच्या अश्शील फोटोंवर पडली, तिला किळस येत होती आणि वाटत होतं कि किळस नेमकी कुणाची येत आहे फोटोंची कि राजनची. सुचतंच नव्हतं तर एका मॅसेज वर नजर पडली, जाणू लव्ह यू , खास तुझ्यासाठी आणि फोटो होता तिचा …. कही मॅसेज होते ज्यात स्वतः राजन नेही लव्ह यू लिहिलं होतं.. आणि खूप असं काही काही जे वाचल्या जात नव्हतं. अंगाला शहारा आला होता रंजूच्या. तिने एक नजर राजनवर टाकली, मोबाईल तिथेच ठेवून दिला आणि दबल्या पावलाने तोंड दाबत आतल्या खोलीत निघून गेली.

रंजू खेडयातली, बारावी पास मुलगी होती, नर्सिंगचा कोर्स करणारच होती तर लग्न जुळलं. सासू साऱ्यांना फार आवडली होती ते तिच्या गोऱ्यापान दिसण्याने आणि गावातल्या संस्काराने. नर्सिंगचा कोर्स ती शहरात करेल असा शब्द दिला होता राजनने. पण लग्नानंतर लगेच दिवस गेलेत आणि आता तर ती घरातच नर्सिंगचा लाईव्ह कोर्स करत होती. राजन तिला तिच्या गावठी वृत्ती साठी नेहमी बोलायचा, तिला नेहमी चार पैसे वाचवण्याचा  ध्यास असायचा, ज्याची राजन सतत खिल्ली उडवत असायचा. तिला घालून पडून बोलणं त्याच सुटत नव्हतं, लग्नाला जेमतेम दीड वर्ष झाली होती आणि राजनच्या बोलण्याची रंजूला सवय झाली होती, गावातली मुलगी होती अपमानाचे बोल पचवत होतीच. पण तिला त्याचं हे व्हर्चुअल रेलेशनशिप पटत नव्हत..

रंजु कसा मार्ग काढते वाचा पुढच्या भागात …. ह्या व्हर्चुअल रेलेशनशिपचं काय होतं नक्की वाचा. आपण सर्वानीच अनुभवल्या आहेत काही ना काही प्रमाणात अश्या गोष्टी पण अश्या माणसांची मानसिकता किती भयंकर असते हे सांगणे कठीण… व्हर्चुअल जागाच एक वेगळ रूप ‘व्हर्चुअल रेलेशनशिप’.

आधुनिक जगाचं एक वेगळं पान, जरा चाळूया……

.पुढच्या भागासाठी पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका.

भाग दुसरा इथे वाचा http://www.urpanorama.com/13673/

©उर्मिला देवेन

urmiladev@gmail.com

तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!!!

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

फोटो साभार गुगल.

 

Facebook Comments

You may also like...