Marathi blogs, नाते संबन्ध, प्रेम कथा, प्रेरणादायक

माझं छोटसं आभाळ…भाग १ आणि २

शारूला सुधीर पिकअप करायला कॉलेज मध्ये आलेला, गेटच्या बाहेर तो स्वतःचा गॉगल डोळ्यावर घालून बाईकच्या आरश्यात डोकावत मटकत होता. येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजच्या मुलीनांहि टापा टापी सुरु होती.  मुलीही त्याला बघून हसत होत्या. सुरु होतं त्याचं टाईमपास करणं. त्याच्या त्या उंच धिप्पाड आणि गोऱ्या रंगावर तो काळासा गॉगल जणू गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा वाटत होता. मग जाणारी येणारी प्रत्येक मुलगी एकदा परतून बघतच होती आणि हा तसं तसा छाती फुलवून उभा होता. आजही नियमाप्रमाणे तो शारूला घ्यायला आलेला. भारी जीवं होता त्याचा शारुवर, अगदीच वयात आल्यापासून त्याला ती आवडायची. जणू मनोमन तिच्यावर तो हक्क दाखवायचा. आणि ती त्याच्या आयुष्यात म्हणून मिरवायचाही.

शारूचं सुधीर वर खूप म्हणजे खूप प्रेम, तसा सुधीर तिच्यासाठी पझेसिव्ह आहे हे तिला चांगलंच माहित होतं. पण आवडायचं तिला, भन्नाट वाटायचं त्याचं ते काळजी घेणं आणि रागावणं. सुधीर जरा नात्यातला मुलगा मग घरात कुजबुज होती दोंघाच्या प्रेमाची, कुणी काही बोलत नव्हतं, जरा जमल्या सारखंच होतं. मग काय सुधीरराव  चक्क शारूला रोज ने-आण करत असायचे. भेट वस्तू देणं, दोघेही फिरायला जाणं, सर्व सुरु होतं तेही लपून पण सर्वांना कळायचं. हळू हळू घरातल्यानमध्ये लग्नाची बोलणी सुरु झाली. सुधीरचा नौकरीत जम बसला होता आणि शारूच पदवीचं अंतिम वर्ष होतं.

तिच्या आईने सुधीरच्या आईशी गुपचूप दोघांच्या लग्नाची वार्ता केलेली, सुधीरच्या आईलाही शारू पसंत होती मग दोघ्याही आया खुश होत्या आणि आपल्या आपल्या परीने तयारीला लागल्या होत्या. दोन्ही घरच्यांना वाट होती ती शारूच्या पदवी परीक्षेची.

शारूला उडत उडत सगळं माहित होतं, मनात आनंद होताच, सुधीर भावी नवरा म्हणून हवाच होता ना! स्वारी खूप खुशीत असायची, चेहऱ्यावर तेज वाढत होतं. मनात आत्मविश्वास भरत होता. सुधीर आयुष्यात येणार हे नक्की झालं होतं तिच्यासाठी. आता तिचं एक स्वप्न उरलेलं होतं. विश्वास होता सुधीर तिला साथ देणारचं.

सुधीरला शारू दुरून दिसली, त्याने हॉर्न वाजवला, ती त्याच्या कडे येण्यासाठी वळली, तोच रुद्र समोर आला, “हे शारू, काय मस्त दिसतेस ग तू! “

तो त्याच्या हाताचा कॅमेरा करत तिच्याकडे वळला, “उंची पण मस्त आहे तुझी, मी ऐकलं कि तुला एयर होस्टेस व्हायचं आहे म्हणून.”

“हो, पण तुला कुणी रे सांगितलं?”

“सांगायचं काय, कॉलेजच्या ह्या वर्षीच्या मॅगझीन मध्ये तूच लिहलं आहेस कि”

शारू हसली, तोच रुद्र परत बोलला, “हाय..यार! ..काय हसतेस! मारलं यार, तू ना झालीच एअर होस्टेस आता.”

“ये, उडवू नकोस.”

“उडवत नाही, हा पॉम्पलेट बघ, एन्ट्री कर ऑनलाईन, तुझे उत्तम फोटो अपलोड कर, छानसं वक्तिमत्तव मांड, ट्राय इट. टेक ट्रेनिंग आणि गो फोर इंटरव्ह्यू.”

शारू  बघतच हक्का बक्का झाली, “रुद्र, खूप थँक्स रे, मी माहिती जमवतच होते ह्या एन्ट्रीची. खूप मदत झाली मला. ”

“ये, असं काय म्हणतेस? एयर होस्टेस झालीस ना, कि येतोना त्या फ्लाईट मध्ये.. ”

शारू खूप आनंदली होती. रुद्र तिचा क्लास मेट होता, जरा मदत जाणारा स्वभाव होता त्याचा. शारू मेहनती आहे हे त्याला माहित होतं.

शारूला रुद्रशी बोलतांना सुधीरने बघितलं होतं. शारू आनंदात सुधीरकडे आली, सुधीरने बाईकची किक मारली, शारू त्याला बिलगून बसली आणि बाईकची सवारी सुरु झाली, शारू अलगत सुधीरला म्हणाली, “सुध्या, मला ना… एअर होस्टेस चा फॉर्म भरायचा आहे.”

“भर ना, कुणी अडवलं? “

शारू अगदीच लाडीत येवून म्हणाली, “थँक्यू थँक्यू. “

“पण गरज काय ग त्याची? लग्न होणार आहे आपलं आता, जरा नावरीपण आण ना, आवडशील मला, स्वयंपाक शिक, मला आवडतील तुझे नव नवीन खाण्याचे प्रयोग.”

“ते तर करेलचं रे, मला व्हायचं आहे रे… एअर होस्टेस!”

“भर मग, तेवढाच तो तुझा टाईम पास…. मी तर वाट बघतोय तुझ्या परीक्षेची.”

शारू जरा रुसली होती पण मनात नक्की होतंच सुधीर आपलाच आहे, माझ्या मनाविरुद्ध नाही मला वळवणार हे तिला वळलं होतं. मग तिने त्याच्या त्या बोलण्यावर फारसं लक्ष दिलं नाही. हळूच त्याला म्हणाली, मला आज ईशा दी कडे सोड ना, तिच्याशी बोलायचं मला

सुधीरने हलकासा होकार दिला आणि बाईकची स्पीड वाढवली, तशी ती त्याला गच्च बिलगून बसली आणि वाऱ्याच्या वेगाने स्वप्नात शिरली, जणू आज ती बाईकवर एअर होस्टेस होती. मन टेक ऑफ करून आकाशात कधीच गेलं होतं.

काचकन ब्रेक लागला आणि ती दाणकन भानावर आली, सुधीर तिची मस्करी करत म्हणाला, “शारु लेंड झालय ग माझं विमानं, उतर आता. ईशा दीचं घर!, मला निघायचं आहे माझी एक मिटिंग आहे. “

शारु स्वतःला सावरत म्हणाली, “कुठली रे?

“कॅम्प्नीत नवीन प्रोजेक्ट सुरु होतोय आणि कदाचित मला लीड करायला चान्स आहे, तू माझा लकी चाम म्हणून आधी तुला घ्यायला आलो, तुला भेटलं कि सर्व काही मनासारखं होतं माझ्या.”

शारु परत गोड हसली त्याच्या त्या बोण्याला तिने परत गोडपणे मनावर घेतलं आणि परत त्याच्या कुशीत शिरली, “काय रे! तुझी मेहनत आहे, चल ऑल द बेस्ट.”

अचानक घरातून भांडण्याचा आवाज येत होता, सुधीरला निरोप देवून ती घरात शिरली, जरा थबकली, ईशा दी आणि तिचे प्रिय जीजू मनोज भांडत होते, जीजू खूप रागात होते आणि दीपण. म्हणून शारु जरा बाहेरच्या खोलीतच उभी राहिली, तिला विषय फारसा कळत नव्हता.

ईशा दी रागात म्हणाली, “मनोज तू आधीसारखा माझ्याशी वागत नाहीस.”

“आधीसारखा म्हणजे काय? तुला काय कमी आहे का? माझ्या सोबत राहतेस, पार्ट्या मध्ये तू सोबत असतेस, माझ्या प्रत्येक गोष्टीत बरोबरीची पार्टनर आहेस.”

“हे असलं बोलून माझं तोंड बंद करू नकोस, दर वेळीस तुझं हेच असतं.”

“मग अजून काय हवं तुला, हेच आयुष्य आहे.. खास करून स्त्रीचं..आणि मी तर तुला काही बंधनातही ठेवत नाही. तुला जे वाटते ते तू कर.”

“असं? काय करतोस काय तू माझ्या साठी, घरासाठी, आपल्या बाळासाठी?”

“मग कुणासाठी मर मर करतोय मी!”

“मला काय माहित! मला तर नकोय हे सारं. मला.. “

मनोज तिचे शब्द काटत म्हणला, “तुला काय हवं? बोल! बोल! बिझनेस करतो मी, स्वतःच्या मेहनतीने इथवर आलोय.. तुझ्या सारखा नाही, तुझ्या आई वडिलाकडे काय कमी होती तुला आणि इथे तर ती राणी आहेस.”

“बिलकुल बोलू नकोस, हो माझ्या माहेरी कधीच कमी नव्हतं पण माझी मर्जीही असायची.”

“म्हणजे .. कुठली गोष्ट तुझ्या मर्जीची नाही इथे, हे घर तुला आवडेल ते ठिकाणी घेतलंय मी. माहित आहे का ह्याची किंमत किती आहे! “

“पैश्याचा तोरा दाखवू नकोस, मीही जॉब करायची, अरे तुझ्या पेक्षा जास्त कामायची मी… तुझ्यासाठी सर्व सोडलं..तू म्हणत होतास सर्व निट झालं कि परत जॉईन कर म्हणून.. आणि आता प्रत्येक वेळीस तुझं काही ना काही असतं.. “

“अग पण आता बाळ आहे आपलं. “

“हो तेही कारणच तुला…. “

आवाजाने त्याचं दोन वर्षाच बाळ उठलं आणि जीजू तडका पडकी घरातून निघून बाहेरच्या खोलीत आले, “हे, कधी आलीस? बऱ, जरा दी सोबत राहा.. जाम भडकली आहे माझ्यावर.”

जातांना ओरडून म्हणाले, “मी येणार नाही बहुतेक आज, मिटिंग नंतर माझी ड्रिंकिंग पार्टी पण आहे, तू आज इथेच थांब.”

शारुने जीजुला होकाराचा हात दाखवला आणि आतल्या खोलीत शिरली, शारुला अजूनही ईशा दी आणि जीजूच्या भांडणाचा नेमका विषय कळत नव्हता, तिच्यासाठी ते नेहमी आदर्श पेअर होतं. कधी ईशा दी हि बोलली नव्हती आणि आज हे अचानक असं सर्व बघून तीही काहीशी चिंता ग्रस्त झाली होती.

भाग २

शारु आत आली आणि शारुला बघून ईशा दी रडायला लागली,

“हे असचं सुरु असतं ग हल्ली, ह्या रात्री रात्री पार्ट्या आणि नुसत बिझी असणं”

“दी, जीजुच काही बाहेर तर नाही ना? “

“तसलं तर असूच शकत नाही! कोण झेलणार ह्या माणसाला? मीचं आहे म्हणून त्याच्या नशिबाला.

“मग नेमकं काय ग?,तू अशी बोलतेस मग काळजीच ना?”

“त्याचं हे कामासाठी अगदीच स्वतःला घरापासून अलिप्त करणं, मीही काही आहेच ना! मी फक्त घर बघावं असचं ह्याच म्हणन आहे. नौकरी करावी बाहेर निघावं असं वाटतं ग आता, ह्याच्या आईला आणू म्हणते तर हा नाही म्हणतो. का तर ह्याचा हारानटी पणा दिसेल ना तिला, आता तर मीच दिसते ना आता….बळ बळणारी तिच्या ह्या  अति हुशार पोरावर.”

“पण नेमकं काय आहे दी, जीजुने काहीच मानवर घेतलं नाही, ते तर हसत बोलत होते माझ्याशी आता, जावूदेना.”

” हो, सगळं जावूच देतं आहे म्हणूनच अजून आहे इथे, सगळं मीच बघावं असं म्हणतो, तो फक्त बिझनेस करणार, काही म्हटलं तर, कुणासाठी करतो असं म्हणून मोकळा होतो. लग्न केलंय, घर त्याचीही जवाबदारी आहे. बाळाला तोही हवा असतोचं, नुसतं माझ्या मुलाला हे बनवेल, मेरा बेटा ये करेगा वो करेगा ..असंच म्हणून होतं का ग? मुलासोबत वेळही घालवावा लागतो.”

ईशा दी खूप भावूक झाली होती, लग्नाआधी मनोज जीजूची स्तुती करतांना न थांबणारी आज स्वतःचे हुंदके थांबवत होती. गालावर पडण्यासाठी आतुर अश्रू तिने शारुच लक्ष न नसतांना अलगत पुसले. बाळाला कवेत घेतलं, भिरभिरल्या डोळ्याने म्हणाली

आपण गृहीत धरल्या जातो ग…

स्त्रियांना गृहीत धरल्या जातं,

स्वप्नांना हळूच छाटल्या जातं,

मन मारून जगायला शिकवल्या जातं.

स्त्रियांना गृहीत धरल्या जातं

बोलता बोलता ईशाला, तीच बालपण आठवलं, कॉलेजची मस्ती चेहऱ्यावर हळूच हास्य देत होती, ते रात्री रात्री अभ्यास करून मिळवलेले मार्क्स, त्या गोल्ड मेडलच्या पार्ट्या, तो तोरा, ते फुलपाखरा सारखं उडणं…त्या आठवणीच्या प्रत्येक स्पर्शाने तिच्या मनातले आणि चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. शांत झाली होती. हरवली होती, बळाने हाक मारली आणि लगेच परत आली. जरा मळ मळ वाटायला लागलं, ती लगेच बाथरूम कडे धावली, तिला उलटी झाली. स्वतःला सावरत ती शांत झाली, “हे काय नवीन मधात माहित नाही ग बाई… आता नको रे बाबा काही.”

“तू टेस्ट केलीस का?”

“नाही अजून .. पण मनोज प्रिकॉशन घेतोय, तसलं काही नसणार, मीच जरा जास्त वेळ जागली काल, मला झोप झाली नाही कि होतं असं. तेच असेल.”

“तू पड जरा मी आल्याच्या चहा करते आपण बाल्कनीत बसू आणि गप्पा करू.”

शारु ने अलायचा मस्त चहा केला, कपाटातल्या खाऱ्या प्लेट मध्ये घेतल्या, बाळाला उचललं, त्याच्या साठी चटई घेतली आणि दोघीही बसल्या .

शेजारच्या घरी एक वयस्कर जोडपं राहत होतं. ह्यावेळेवर दोघेही काका काकू निवांत बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून गप्पा करत असायचे. आणि हे शारुला माहित होतं, मग जरा बोलावं आणि ईशा दी चा मूड बदलावा म्हणून तिने जरा बाल्कनीतून डोकावलं. आज तसं काहीच नव्हत, काकू एकट्याच बसल्या होत्या. शारु गुमान ईशा दी कडे वळली,

“दी, आज इकडे का ग सन्नाटा, माधवी काकू खाली डोकं टाकून बसल्या आहे. “

ईशानेही जरा काही माहित नसल्या सारखे भाव चेहऱ्यावर आणले. जरा बघावं म्हणून इकडे तिकडे बघितलं तर काका गेट मधून बाहेर निघत होते, तीही जरा दचकली, “अग, पण असं कधी मी बघितलं नाही, जायचं असलं तरी हे दोघही सोबत बाहेर जातात.”

मग तिने स्वतः बाल्कनीतून डोकावलं, “काकू काकू, का हो? काय झालं? सगळं ठीक ना?”

काकू लाल झालेला आणि निस्तेज चेहरा त्यांनी वर केला, “काही नाही बाळा… आयुष्य कसं असतं ना, एवढे वर्ष सांसार करूनही आपण आपल्या म्हणाऱ्या माणसाला ओळखू देखील शकत नाही. तो आपलाच आहे हा विश्वास काळानुसार बिंबवून टाकतो आपण. येवढ्या वर्षानंतर काही गोष्टी उलगळतात, हतबल होतो आपण, आता काय करणार म्हणून समजवत असतो स्वतःला आपण, आणि हि दुनियाही आता काय करायचं… जावूदे … हेच सांगत असते. आणि मग ओघात आपण हेच आपल्या पीढीला देवून जातो, पुरुष परत तसाच वागतो आणि चक्र सुरूच राहते. आपण ज्याला स्वतःच आभाळ मानतो ते आपलं नसतं हे आता कळावं.. काय ते आयुष्य मग?”

काकू का अश्या बोलत होत्या त्या दोघींनाहि कळत नव्हत. पण काकू कडे बघितल्या नंतर त्याची काहीही विचारण्याची मनस्थिती नव्हती. होकाराला होकार देत दोघीही उभ्या होत्या.

काकु आता झोपाळ्यावरून उठून अगदीच जवळ आल्या, मग ईशाने बाल्कनीतूनच त्यांना तिचा चहाचा कप दिला.

काकू ने तो घेतला आणि कुठल्या तरी तंद्रीत चहा पीत होत्या जणू आयुष्याचे क्षण त्या गिळत होत्या. चहा पिऊन झाला आणि अलगत म्हणाल्या, “इशू, खूप धन्यवाद बाळा, चहा हवाच होता मला.”

ईशा जरा स्मित हसली, तर परत म्हणाल्या, “ह्या वेळचा चहा हे करत असतात ना… आणि लागलीच गप्प झाल्या. लगेच जायला निघाल्या.

ईशा त्यांना म्हणाली, “काकू काही हवाय का तुम्हाला? सगळं नीट आहे ना ? काही लागलं तर आवाज द्या मला. आज शारु पण इकडेच राहणार आहे.”

काकूने पाठमोऱ्या शरीरानेच हात दाखवला आणि घरात निघून गेल्या.

काकू काका दोघानेही साठी ओलांडली होती, त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी होती, मुलांची लग्न झालेली आणि ते आपल्याला ठिकाणी मजेत होते. दोघही म्हातारे एकमेकांच्या सोबतीने आनंदात राहत होते. त्याचं एकमेकांवरच प्रेम हे सर्व सोसायीटीत कुतूहलाचा विषय होता. कुठे जाणं म्हणा कि कुठे काही कार्य दोघेही सोबत असायचे. बऱ्याचदा ईशाही मनोजला उदाहरण द्याची त्याचं. पण आज असं काय झालं होतं काकूला बोलायला हे काही केल्या ईशाला कळत नव्हत. नेहमी हसत बोलणाऱ्या काकू आज उदास होत्या. त्याच्या कडे बघितलं कि आयुष्य पुढ सुंदरच आहे हि जाणीव शारु आणि ईशाला नेहमी होत असायची पण आयुष्याचा पडता काळ असाही गंभीर असू शकतो हे त्यांना आज कळालं होतं पण उमगत नव्हतं.

नकळत स्वतः च सर्व दोघीही विसरल्या होत्या आणि त्यांच्या विचारात आता काकू शिरली होती. मध्ये मध्ये ईशाला परत गरगरत होतं. शारु झोपेपर्यंत काकुच्या गोष्टी आठवतं होती आणि ईशाला सावरत स्वतः चा विचार करत होती.

शारु, ईशा आणि माधवी काकू, तिन्ही वेगवेगळ्या वयातल्या स्त्रीया आहेत… शोधताय स्वतःच आभाळ … नक्की वाचा त्यांना स्वतःच आभाळ खरच मिळतं….

पुढचा भाग लवकरच …

पुढच्या भागासाठी पेजला लाईक करायला विसरू नका

Facebook Comments

You may also like...