भाग १ इथे वाचा http://www.urpanorama.com/13505/
सगळं इथेच विसरायचं ह्या विचारात तिने कसं बसं स्वतःला सावरलं आणि प्रक्टिस साठी पोहचली, सुधीर आधीच पोहचला होता तिला बघून तो स्मित हसला आणि अलगत तिच्या शेजारी येवून बसला,
“सुंदर दिसते आहेस तू, तुझा हा सावळा रंग अगदीच मोहात पाडतो मला”
त्याने मग तिला हात लावला आणि म्हणाला, “हे नक्षीदार डोळे किती घायाळ करतात जाणू… तुला काय माहित…? अख्खी रात्र घालवावीशी वाटते ह्या डोळ्यांसमोर.”
“सुधीर हात सोड! तुझ्या हातात आधीच दुसऱ्याचा हात आहे…. माझं अजून ओझं वाढवू नकोस. आधीच तुटलेल्या नात्याचं ओझं वाहते आहे मी… अजून जवळ नको येवूस “
“हे .. काय बोलतेस तू…. माझं खरंच प्रेम आहे तुझ्यावर.. ” आणि सुधीरने तिचा हात आणखीनच घट्ट पकडला.
“सुधीर दुकतोय हात माझा, सगळे बघत आहेत..प्लीज सीन क्रियेट करू नकोस.”
“अग, सॉरी..पण तू अशी नको ना बोलू… किती मस्त फील होतं मला तुझ्यासोबत.”
तेवढ्यात म्युझिक रूम मधून बोलावणं आलं आणि दोघेही आत गेले, अरुणा ने सर्व विसरून अगदीच मनातून गाण्याच्या शब्दा नि शब्दाला मान दिला. रेकॉर्डिंग संपताच ती सुधीरचा डोळा चुकवून निघाली. बराच वेळ सुधीरला ती स्टुडीयओत दिसली आणि मग तोही तिच्या खोलीकडे निघाला.
अरुणा घरी पोहचली होती, रडून लाल झाली होती, नाकातून शेम्बुळ वाहत होता, जरा गर गरल्या सारखं होत होतं तिला. सुधीरची गाडी घराजवळ थांबली आणि तिला घरातच धडकी भरली. दाराला पाठमोऱ्या शरीराने टेकून ती उभी होती. अंगात ताप भरला होता…भर उन्हाळ्यात तिला थंडी वाजत होती.
तोच दारावर थाप पडली, “अरु, दार उघड!”
“नाही.. तुम्ही निघा..मला बर नाही आहे.”
“मी डॉक्टरला बोलवू का? तू स्टुडीओ मधूनही लवकर आलीस. “
“नाही… तुम्ही निघा..प्लीज”
“अरु दार उघड आधी. “
अरु आधीच घाबरली होती अजून आवाज झाला तर आजू बाजूचेही त्यांची दार उघडून बघतील ह्या भीतीने तिने दार उघडलं, “प्लीज निघा तुम्ही. मला नाही बोलायचं तुमच्याशी, आणि इथे येत जावू नका.”
सुधीरने तिला हात लावला आणि म्हणाला, “तुझं अंग किती तापते आहे, मी आत्ता डॉक्टरांना फोन करतो” आणि त्याने लावलाही.. अरुणाच्या नाही हो मध्ये डॉक्टर तिथे येवून पोहचला आणि त्याने अरुणाला चक्क बेड रेस्ट सांगितली. बसं सुधीरचा सर्व मुक्काम आता तिच्या घरी होता. तो तिची सेवा अगदीच मनातून करत होता आणि ती हे सर्व बघून काहीशी कासावीस झाली होती. तिला कसलाही त्रास न देता तो ती बरी होताच निघून गेला. अरुणाच्या मनात त्याच्या बदल आदर वाढला असला तरी तिच्या मनात तिच्या नात्याबाद्ल सलही वाढत होती.
महिने झाले दोघांत भेट नव्हती. अरुणा सावरली होती पण मनात अवघडलेली असायची. त्या दिवशी ती अचानक स्टुडीओ बाहेर सुधीरला भेटली आणि तिच्या काळजात परत धडकी बसली.
“हे किती दिवसांनी बघतोय तुला, चल कॉफी घेवू सोबत. “
नकळत होकार देत अरुणा सोबत निघाली, कॉफी घेत असतांनाच सुधीर तिला म्हणाला, “मला तू खूप आवडतेस, तुझ्यासोबत असतांना मला कसं मनमोकळ वाटतं. मझ्या प्रत्येक टेन्शन च समधान असते तुझा शब्द. हो माझं लग्न झालंय सारीकाशी पण प्रेम तुझ्यावर आहे माझं, आणि काय ग प्रेम असणं म्हणजे लागलीच लग्न करायला हवं काय, तू आणि मी चांगले सहमित्र म्हणून नाही राहू शकत? तुझी सोबत आवडते मला आणि मला माहित आहे तुलाही आवडतो मी. “
“पण, तुमच्या बायकोला कळलं तर… “
“कळणार कसं? ती मुलामध्ये फार गुंग असते, माझी तिला पर्वाही नसते.”
“आणि काय ग तू लग्न केलं होतंस ना..टिकलं नाही ते. लग्न ना सर्व गोष्टीचा इलाज नसतो. बंधन कशाला हवं. तुही मोकळी आणि मीही. “
अरुणाला हे सगळं मनात खटकलं असलं तरी पटलंहि होतं. विचारात दिवसं निघत गेले आणि मग हळू हळू ती समीर मध्ये गुंतत गेली. दोघेही सोबत राहायचे, फिरायचे, आवडी निवडी एकाच होतंय मग मस्त जमायचं त्याचं. अरुनाला प्रेमासाठी अधीर असलेला तिचा मनातला कप्पा पूर्ण वाटत होता आणि सुधीरला ती हवी होती.
त्या दिवशी शनिवार होता आणि सुधीर त्याच्या बायको मुलांसोबत मॉल मध्ये फिरत होता, अचानक अरुणा समोर आली, ती दचकली, आपली चोरी पकडल्या गेल्या सैर वैर झाली. सारिका, सुधीरची बायको, लांब, बारीकशी अगदीच हाड दिसावेत अशी, तोंडाचा पूर्ण चंबू झालेला, एवढी भारी साडी घातेललेली पण शोभत नव्हती तिला. डोक्यावर खूप चिंता आणि मनात कदाचित शंकाहि. अरुणाची सुधीरशी नजरभेट होताच तिने सुधीर कडे आवक होवून जणू बघितलं आणि सुधीरने अशे भाव चेहऱ्यावर आणले कि तो अरुणाला ओळखतही नाही. तेवढ्यात अरुणा लपल्या सारखी बाजूला झाली आणि दुरून सर्व बघत होती. आपल्याला सुधीरने ओळखही न दाखवल्याच तिला वाईट वाटलं. मग एक नजर तिची परत सारीकावर पडली तिची, तिला बघताच स्वतःला दोषी समजून हळहळली ती. आपण चुकीचं वागतोय हे तिला बोचत होतं, सारिका कडे बघून तिला सुधीर कदाचित त्रास देत असावा असचं काहीस तिला वाटलं. आणि स्वतःच्या बाजूने आपण हे सर्व थांबवावं असा तिने निर्णय घेतला.
घरी आली विचारात स्वतःला खूप वाईट बोलली, राहून राहून तिला सारिका आठवत होती. तीच ते नवऱ्याच्या प्रत्येक शब्दाला हो म्हणणं आणि मागे मागे असणं. काहीसं स्वतः मधेच राहणं तिला मनातून खात होतं. स्वतःला सुधीर सोबत असतांना आपण कसं राहतो हे आठवून तिला सारिका साठी खूप वाईट वाटत होतं. टीपटिपल्या डोळ्यांनी ती घरी आली, विचारात पडली होती, “मी आवडती असूनही माझी ओळख आज समाजासमोर नाकारली आणि ती नावडती असूनही त्याच्या सोबत पत्नीच्या हक्काने होती. माझ्या समोर त्याने तिला जवळ घेतलं आणि मला ओळखलही नाही, आणि आम्ही दोघीही अवघडलो, ती त्याच्या कुशीत आणि मी लपून. कोण चुकलं माहित नाही. ती मी कि आमच्यातला समजूतपणा? “
आणि फोन वाजला, “अरु सॉरी, मुलं होती ग सोबत… “
“हो… ठीक आहे .. पण माझी मी कळली आज मालच”
“काय ..? “
“असुदे… “आणि तिने फोन ठेवला
नंतर बरेच दिवस ती कुठेच गेली नाही, आणि सुधीरही अमेरिकेला गेलेला मग भेटीही नव्हत्या, गायनाच्या स्कील मुळे तिला शाळेत नौकरी भेटली आणि नवीन ठिकाणी तिने शिफ्टिंग केलं. जरा नवीन खुमारी शिरली होती तिच्यात. शाळा, मुलं, नवीन लोकं, होणारी गायनाची स्तुती सगळं कसं तिला भूतकाळ विसरायला लावणारच होतं.
त्या दिवशी तिला शाळेसाठी निघायला जरा घाईच झालेली, मळमळतहि होतं, ताप आल्यासारखं वाटत होतं, आरश्यात बघितल्यावर कोमेजलेला चेहरा खूप काही बोलून गेला तिला, ठरवलं, शाळेतून येतांना डॉक्टरकडे जावून यावं. परत घेरी येतांना ती डॉक्टर कडे गेलेली आणि मग…
“अरुणा, तू आई होणार आहेस, तीन महिने झालेत, उद्या मिस्टरांना घेवून ये, तुझं सगळं मी त्यांना समजावून सांगते. “
“डॉक्टर! कसं? “
“अग हो.. काळजी घे. “
अरुणाला पहिल्यादा आनंदच झालाच नाही पण दवाखान्यापासून तर घरी पोहचेपर्यंत बाळासाठी प्रेम फुललं होतं, घरी येताच तिने कपाटात बंद करून ठेवलेला सुधीरचा फोटो काढला आणि त्याला न्याहळत बसली, “सुधीरच नाक खूप मोठं आहे आणि गोरा आहे तो, माझं पिल्लू नेमक कसं असणार, माझ्या सारखं? छे माझी तर बोटं पण छोटी आहेत.. पण …सुधीर म्हणतो नेहमी कि मी सावळ्या रंगाची राणी आहे म्हणून पण ….मुलगी झाली तर….रंग माझा नकोच.. सुधीरला सांगू..हुम्म..तो आला असेलं का अमेरिकेतून.. आलाय मीचं मागे त्याचा फोन नाही उचलला होता. “
मगतिने सुधीरला फोन लावला, “सुधीर, कसा आहेस? “
“आली का माझी आठवणं, किती कॉल करतोय तुला… हो ..मीपण जरा बिझी होतो..भेटायचं का..खूप दिवसं झालेत ग. “
“सुधीर ये ऐकना, तुला गोड बातमी द्यायची आहे. “
“कुठली? आपण कुठे भेटतोय? तुझा काही नवीन प्लन… मज्जा “
“ये… मला हवंय रे हे बाळ.. अगदीच तुझ्या सारखं दिसणार.. गोरंस.. तुझं बाळ “
“हा काय बावळट पणा आता… “
“आरे मी आई होणार आहे तुझ्या बाळाची. “
“अरु.. काय बोलतेस तू..,,आपण तीन महिने झालेत भेटलो पण नाही….कसं शक्य आहे हे….काहीही बोलतेस तू”
“अरे हो… तुझच बाळ आहे हे…आता तीन महिने झालेत”
“शक्यच नाही..आणि पण पूर्ण काळजी घेतोच..मग? “
“मला माहित आहे तू विसरला होतास त्या दिवशी काळजी घ्यायला…आणि मग… “
“ये..काहीपण बोलू नकोस.. माझं नाही ते बाळ..आणि माझ्या मत्ते कुणाचही बाळ टाकू नकोस. “
“कोण जाने एकटी राहतेस तू… कुणाचं असावं काय माहित.. माझी आणि तुझी आता किती महिने झाले भेट पण नाही. “
अरुणाला रडू आवरलं नाही, तिने फोन ठेवून दिला.. रात्र भर रडत राहिली. सकाळी परत सुधीरचा फोन आलेला, तिने परत खूप उत्साहात उचलला कि त्याच काही मत परिवर्तन झालं असेल.
“सुधीर..तुझच रे हे पिल्लू “
“हा अरु, मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांशी बोललो आहे, तू आत्ता तिकडे जायचं आणि ते बाळ पाडायचं.. मला त्याच्याशी काहीही लेणं देणं नाही कि ते कुणाचं आहे. “
“अरे राहू देत ना रे… तुझ्यासारखं असेल रे ते…आपण त्याला गायक बनवू “
“हे बघू गुंतू नको..उगाच तुही गोत्यात येशील आणि मी पण “
“आता निघ तू “
अरुणाने फोन ठेवला आणि ती निघाली, बाळाला सुधीरने नाकारलं होतं मग अरुणा काय करणार होती. बाळाचा हक्क मागून तू सारिकाला त्रास देवू इच्छेत नव्हतीच आणि आत्ताच तिची नौकरी लागलेली… काय करावं सुचत नव्हत मग निघाली सुधीरने सांगितलेल्या डॉक्टरांकडे …
पुढ काय झालं नक्की वाचा.. कथा स्त्रीची…मनाची आणि विस्कटलेल्या जीवाची…. आवडती आणि नावडती….
कथेच्या प्रकाशनाचे सर्व अधिकार कायद्याने उर्मिला देवेन कडे राखीव. माझ्या पुढल्या कथेसाठी पेजला लाईक /फॉलो करा.
©️उर्मिला देवेन
फोटो साभार गुगल
धन्यवाद! 🙏🙏
माझ्या नवीन कथेसाठी/ लेखासाठी माझ्या पेज लाही लाईक करू शकता https://www.facebook.com/manatlyatalyat/
————————-
सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. लिंक शेअर करायला माझी काहीच हरकत नाही. पण, कथा चोरून/ कॉपी पेस्ट/एडिट करून स्वतःच्या नावाने वेगवेगळ्या ग्रुप्सवर किंवा इतर ठिकाणी प्रसिद्ध /पोस्ट केल्यास कॉपी राईट कायद्याचे उलंघन समजून कादेशीर कारवाही करण्यात येईल.