नाते संबन्ध, प्रेम कथा, प्रेरणादायक

पती-पत्नी….कभी प्यार तो कभी तकरार… व्हॅलेंटाईन डे स्पेशल…

सादर लेखाचे पहिले व्हर्जन दोन वर्षाआधी मॉम्सप्रेसोवर प्रकाशित झाले होते(पती पत्नी- कधी दोस्त तर कधी दुश्मन ) त्यानंतर सादर लेखाचा इंग्रजी अनुवाद आंतरराष्ट्रीय स्थरावर पारितोषकासाठी नामंकित झालेला होता.  मराठीचा लेख आजही विविध ग्रुपवर आणि वॉट्स अप वर विनानावाने फिरतोय हि खंत आहे. तसेच काही लेखकांनीही स्वतःच्या नावाने प्रकाशित करण्याची चुकी केलीली आहे. प्रतिलिपी आणि मोम्स्प्रेसो सारख्या मोठ्या प्लँटफॉर्म इतर लेखकांनी कधी त्यांच्या कथेचा भाग म्हणून, तर कधी तसाच्या तसा ढापला… पण धन्यवाद माझ्या सक्रिय वाचकांचे ज्यांनी तो माझा आहे असं नमूद करून ती वार्ता माझ्यापर्यंत पोहचवली. असा अतिशय वादाने ग्रासलेला आणि बहू चर्चित लेखाचा दुसरा व्हर्जन तुम्ही वाचणार आहात… फक्त मनातल्या तळ्यातल्या वाचकांसाठी वेलेंटाइन स्पेशल ह्या सदरात…

खास नवरा बायकोच्या नात्याचं गुपित दडलं आहे ह्यात … वाचा आनंद घ्या ..शेअर करा …

पतीपत्नीच्या नात्याला कुठल्याच नात्याची सर येत नाही. खरं कि नाही! टॉम अँड जेरी सारखं वागून सुद्धा सतत बहरत जातं. संसाराच्या वेलीला हळूहळू फुलं लागतात आणि सगळंच सुगंधित होऊन जातं. एखाद्या दिवशी नवरा मित्र वाटतो तर दुसऱ्या दिवशी वैरी. कधी नवऱ्यावर खूप प्रेम करावस वाटतं तर कधी त्याच्यावर सगळा राग निघतो. नवराही काही कमी नसतो त्यालाही बायकोचं दिसते उठून सुटून बोलणी ताणायला, पण आनंदात तिची हवी असते. तिच्या मागे लुडू बुडू केल्याशिवाय त्याला करमत नसतं.

दोन विभिन्न विचारांचे आणि शरीराचे व्यक्ती एकाच नात्यात गुंतलेले असतात. आणि तो गुंता पतीपत्नीच्या सुरेख नात्याचा असतो… ये मोह मोह के धागे तेरी उँगलियों से जा उलझे…..”

“दिमाख कुठे पेंड खायला गेलं होतं कोण जाणे? ह्या असल्या माणसाशी लग्न केलं मी, मला काय स्थळांची कमी होती, रांग लागली होती पण जन्माचा वैरी नशिबाने भेटलाय.” शेजारच्या काकू रडू रडू बोलत होत्या. ऐकून मलाही हसावं कि काय अस्संच झालं. मीही मज्जा म्हणून घरातून आवाज दिला, “काकू काय झालं?”

 “काय सांगू तुला,  दुष्मनाशीच लग्न झालंय माझं.” काकू रडतंच म्हणाल्या, “जाऊ द्या ना  काकू, खुप प्रेम आहे हो काकाचं तुमच्यावर…” मी अगदी मनातून बोलली. “कसलं प्रेम, वीस वर्ष झाले लग्नाला, मुलं मोठी झालीत आणि शिक्षणासाठी बाहेर गेलीत पण हा माणूस! मी म्हटलं आता मुरेल हा माणूस, पण कसलं काय, अजूनही वैरी आहे माझा. मला नेहमीच धारेवर धरण्यासाठी तयार असतो. कधी एका शब्दाचं कौतुक नाही, पण चुका मोजायला नेहमी तयार.” काकू हुंदके देतं आणि स्वयंपाक करता करता कुरकुरत होत्या.

पंधरा दिवसा आधीचीच गोष्ट होती, काकू काकांचा २० वा लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात झाला होता. तेव्हा काकू काकांची फार स्तुती करत होत्या. आणि ते खरंही होतं. त्या म्हणाल्या होत्या कि, “लग्नानंतर नवऱ्याच्या रूपात जिवाभावाचा दोस्त भेटला मला, यांनी साथ दिली म्हणून मी नौकरी करू शकले.” अजूनही त्या दोघांचं कार्यक्रमातलं संभाषण माझ्या मनातून जात नव्हतं आणि आज अचानक हे ऐकलं तेव्हा. नेमकी काय व्याख्या असायला पाहिजे पतीपत्नीच्या नात्याला उमगतच नव्हतं.

मनातल्या मनात हसतं, मी आपली आत आले, आणि स्वयंपाकाला लागले, माझं मिक्सर काम करत नव्हतं, ह्यांना म्हटलं, “जरा मिक्सर बघा ना. मी भाजी कापून घेते. तर पतीदेव पटकन बोलले, “साधं मिक्सर तुला बघता येत नाही, एवढ्या डिग्र्या लावतेस ना नावासमोर.”

हे एकल्यावर माझाही पारा भडकला, आता इथे माझी डिग्री कशी काय  आली, असं म्हणतच भांडायला मी समोर गेले. महाशय बेडवर लोळून मोबाईल वर गेम खेळत होते. चांगलेच चिडले मी, तर मला म्हणतात, “बरोबर तर आहे, इंजिनिअर आहेस ना! तेवढंही जमत नाही. तुझे आई बाबा तर मोठे सांगतात…. आमची मुलगी इंजिनिअर आहे, तिला सगळं येतं….प्रत्येक वेळस अशी छाती ताणली असते तुझ्या माहेरच्या लोकांची.”

मीही चिडले, “मग नसायला हवी? इंजिनिअर काय तुझी आईचं तुला बनवू शकते, जेव्हा तेव्हा मोठा तोरा घेवून फिरत असते…. माझा मुलगा मोठ्या कंपनीत आहे …. “

शब्दाला शब्द एवढे वाढले, आणि विषय काय होता हे कुणालाही माहित राहिलं नाही. दोन दिवस एकमेकांकडे बघणंही बंद. जसे जन्माचे वैरी याच जन्मात भेटला. मग काय, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है…… ” देवदास आणि आशिकी घरातच… अशी परिस्थिती होती.

माझं काही तुझ्यावाचून अडत नाही असं म्हटल्या नंतरच काय अडतं ते कळतं आणि दोन वेगळ्या वाटेवर रागात भरकटणारे त्या नात्याच्या वाटेवर  प्रेमाने सहज वळतात.

काय करता? जाणार कुठे? तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना  अशी गत. त्यातल्या त्यात पाण्यात राहून मगराशी वैर कोन घेणार? हा हेका असतोच. एकमेकांशी कितीही ठरवलं, तरी एका घरात बोलावंच लागते,  झालं हळु हळू बोलणं सुरु…

दोन दिवसांनी किचन मध्ये लुडू बुड करत ह्यांनी मिक्सर बरोबर करून दिला, सांगताना मलाही समजून सांगितला, मीही गुमान ऐकून घेतलं.

ऑफिस मधून येताना व्हॅलेंटाईन डे आहे असं लक्षांत आलं, स्वतःचाच पहिला व्हॅलेंटाईन डे आठवला, मनात सहज विचार फिरला, नवऱ्याला तर आठवतही नसणारं आता, बिझी झालाय, प्रमोशन नंतर. विचारात घराशेजारी पोहचले, सहज काका काकूंच्या घरात डोकावलं  तर काका काकू चहा पीत गप्पा मारत होते. जणू दोन जिवाभावाचे मित्र रमून गप्पा करत होते. माझ्या कानात अजूनही त्या दिवशीचे काकूचे शब्द घुमत होते आणि ओठ हसत होती.

मीही मस्करी केली, “काय काका आज घरी? “

 “अग हिला नाटक बघायला घेऊन गेलो होतो, आवड आहे न हिला नाटकाची. त्याच्याच गप्पा चालू आहेत, काका हसूनच बोलले.”

मीही म्हटलं, “कुठलं”?  दोघेही एकदम बोलले, “तुझं माझं जमेना”

आणि कुणालाच हसू आवरलं नाही.

काकू माझ्याजवळ खूप आनंदात आल्या आणि म्हणाल्या, “अग आज कितीतरी वर्षांनी हे मला व्हॅलेंटाईन डे गिफ़्ट म्हणून नाटक बघायला घेऊन गेलेले. तुझा ग काय प्लॅन? तो तर केव्हाचाच घरी दिसतोय!”

काकूंकडे आश्चर्याने डोळे करत हसतच मी माझ्या घरात पाय ठेवला, तर, आमचे पतीदेव चक्क लवकर घरी, आणि घरातून आले विलायचीच्या चहाचा आणि पकोड्याचा सुगंध येत होता. घरात आल्याआल्या गरमागरम चहा पकोडे मिळाले, ह्यांनी मला तयार व्हायला सांगितलं, आणि आम्ही बाहेर निघालो, प्रेमाच्या लाडीगोडीत मीही विचारलं नाही, कुठे जातोय म्हणून. दोघही काका काकूंच्या, ऑफिसमधल्या गप्पा करत होतो. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. अचानक, हे मला म्हणाले, “उतर इथेच” मी गाडीतून बाहेर उतरले तर सामोरं नाट्य सभागृह होतं आणि बोर्ड लागला होता “तुझं माझं जमेना”………..

मी ह्याच्याकडे मिश्कील पणे बघितलं, हे म्हणाले, “हैप्पी व्हॅलेंटाईन डे डार्लिंग … नाटकानंतर डिनर लाही जातोय आपण अँड नंतर तुझ्या आवडत्या बॉलिंग साठी बुकिंग आहे…. सो चिल अँड एन्जॉय … “

आनंदाच्या टॉप लेव्हल वर होते मी … मीही ओरडले, “हैप्पी व्हॅलेंटाईन डे नवरोबा … “

अलगत सभागृहात हातात हात घालून शिरतांना ओठांवर शब्द फिरले,

“कभी नीम-नीम, कभी शहद-शहद

कभी नरम-नरम, कभी सख्त-सख्त

मोरा पिया, मोरा पिया, मोरा पिया”

एक अनोळखी नातं, पण, आपली स्वतःची जबरदस्त ओळख बनवतं,

रक्ता पलीकडलं, पण, दोघांच्याही धमन्यांन मधून रक्त बनून वाहतं.

भूतकाळ नसलेलं, पण भविष्यासाठी भक्कम असलेलं,

नाजूक, पण,तुटणार,

जगातलं अतिशय पवित्र नातं, मनापासून ते शरीरापर्यंत निभवलं जातं,

कभी प्यार तो कभी तकरार करत,

 कभी नीम, तर कभी शहद वागत,

आयुष्याच्या प्रवासात शेवटपर्यंत सोबत असतं,

पती पत्नीचं नातं…………….. हैप्पी व्हॅलेंटाईन डे ….

सर्व विवाहित जोडप्यांना समर्पित!

Facebook Comments

You may also like...