Marathi blogs, प्रेम कथा, प्रेरणादायक, मनातल्या कथा

संसार मांडते -भाग २

माझ्या हातून सगळंच निसटल्या सारखं झालं होत. लागलीच आई वारली आणि भाऊ दूरच्या शहरात नौकरी साठी गावाकडील सगळं विकून निघून गेलेला. माझं वाटणाऱ्या परक्या घरात स्वतःला शोधत होते मी. नवऱ्याचंही वागणं तुटक होत होत. एक भावना शून्य व्यक्ती सारखी काम करणारी मशीन म्हणून घरात फिरत होते. उठ म्हटलं कि उठ आणि बस म्हटलं कि बस. मनात खूप शंका येत होत्या. अभिजित राव तर घरात जास्त वेळ राहताच नव्हते. त्यान्च्यात Phd लवकर पूर्ण करण्याचा वार शिरलं होत आणि मी वाऱयासारखी दिशाहीन वाहत होते.

स्वतःच्या लहानपणीची लिहिलेली छोटीशी डायरी माझ्या माहेरहून आणलेल्या सामानात भेटली. आणि मी ती वाचण्यात मग्न झाले. मी त्यांत मोठं होऊन काय काय करणार हे लिहिलं होत. लहानपणाच्या खेळात मला डिटेक्टिव्ह व्ह्ययाला फार आवडत होत. खुप धाडशी असतात ना ते लोक, मग मला तसेच व्ह्ययच होत. त्याच विचारात मग्न होते तर नणंदेच्या खोलीतून हसण्याचा आवाज आला. मग मनात ठरवलं,नाही होता आला मला डिटेक्टिव्ह, मग चला घरातल्याच लोकांचे गुपित जाणून घेवूया…. काहीं नाही तर त्यानां आपण समजून घेवू किंवा त्यांची काही मदत करता येईल. मग हळूच नणंदेच्या खोलीजवळ जावून तिला सांगितलं, “शीतल, मी जरा भाजी घ्यायला बाहेर जाते, तुला काही हवं आहे का ?मला जरा वेळ होईल.” तिने अर्ध खोलीचं दार उघडलं आणि अगदीच हसऱ्या चेहऱ्याने मला म्हणाली, “ठीक आहे वहिनी, मी पण एक तासाने एक्सट्रा क्लास साठी जाणार आहे. मला यायला वेळ होईल. आईला तुम्ही सांगून द्याल.”

मी तिच्यासमोर बाहेर निघून गेले आणि जस तिने तिच्या खोलीचं दार लावून घेतलं मी दबक्या पाऊलांनी आत शिरले. माझ्या खोलीतून तिच्या हालचालीवर लक्ष ठेवत राहिले. पंधरा मिनिटाने एक मुलगी आणि मुलगा घरी आले. आणि बैठकीत बसून गप्पा करू लागले. शीतलच्या खोलीतहि आधीच एक मुलगा होता. मग ते सर्वच बैठकीत बसून कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत होते. शीतल आणि तिची मैत्रीण छान तयार होऊन आल्या . थोड्यावेळाने एक गाडी घरासामोर आली मग सर्वच त्यात बसून निघून गेलें. मीही त्यान्च्याच मागे ऑटोने निघाले. ऑटोवाला माझ्या ओळखीतलाच होत मग त्यालाही माझ्या टोळीत सामावून घेतलं आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत एका शेताच्या घरा जवळ जावून पोहचलो आणि आडोश्याला लपून राहिलो. साधारण वीस मिनीटांनी फक्त मुलचं बाहेर निघाली आणि गाडी घेऊन निघून गेली. मी खूप घाबरले होते. तेंव्हा मोबाईल पण नव्हते कि घरच्याना कळवता येईल. माझ्यातलं स्त्रीत्व जागृत झालं आणि त्या ऑटोवाल्याच्या मदतीने आम्ही घरात शिरण्याचा प्रयत करू लागलो. शीतल आणि तिची मैत्रीण फार ओरडत होत्या. मी बाहेरूनच तिला सांत्वना देत म्हटलं, “शीतल मी वहिनी आहे, तू काळजी करू नको. मी बाहेर काढते तुला.” ऑटोवाल्याने खिडकीच दार तोडलं आणि आम्ही दोन्ही मुलींना बाहेर काढलं. दोघीही मला गच्च बिलगल्या होत्या. घरी पोहचलो आणि मी दोघीनांही शांत केलं. ऑटोवाल्याकडे बघितलं तर तो म्हणाला, “बाई, काही काळजी करू नको, मी नाही सांगणार कुणाला, मलाही मुली आहेत.” आणि तो पैसे न घेताच निघून गेला.

शीतल आणि तिची मैत्रीण मला धन्यवाद देत होती आणि मी तिच्या खोलीत त्यानां दोघींनाही सांत्वना देत होते तेवढ्यात आमचे अभिजीतराव आले. तेही मला कधी नव्हे ते शीतलच्या खोलीत बघून जरा चकितच झाले. आणि मला हाक मारत खोलीत शिरले. मी शीतलच्या खोलीतून निघतच होते तर शीतलने माझा हात पकडला, मी मागे पालटले आणि म्हणाले, “घाबरू नकोस, नाही सांगणार कुणालाच. पण तू मला वचन दे कि तू मला तुझी प्रत्येक गोष्ट सांगशील. आणि परत असं करणार नाहीस” तिने मला भरलेल्या डोळ्याने गच्च मिठी मारली. त्या दिवशी मला पहिल्यांदा घरात एक मैत्रीण सापडली होती. माझ्या पहिल्याच डिटेक्टिव्ह कामाचा उत्तम रिझल्ट भेटला होता. शीतल सुखरूप घरी होती. आणि आता शीतलच्या बोलण्यात माझ्याबद्दल आदर भाव आणि डोळ्यात आपुलकी होती.

मी माझ्या खोलीत आले तर, अभिजीतराव खोलीत आदड आपट करत मला बोलत होते, “हि खोली कशी आहे, कशी राहतेस ग, चंगली राहत जा, दुसऱ्या बायका कश्या टापटीप राहतात.” मला लक्षात आलं होत कि ते कुणाबद्दल बोलत आहेत. मी गप्पच ऐकत होते. मग जरा शांत झाले आणि बॅग मधून एक डब्बा काढला आणि म्हणाले, “हे घे माझ्या मॅडम ने तुझ्यासाठी अनारसे दिलेत. किती मस्त झालेत आणि तुला तर कसे करतात माहीतही नाही. त्या एवढ्या शिकलेल्या असून सगड्याच गोष्टी अगदीच मनाने आणि उत्तम करता. त्यानी आपल्याला उद्या बोलावलं आहे जेवणासाठी, मलाही फायनल रिपोर्ट तयार करायच्या आहेत त्यान्च्याकडे. तू छान तयार होऊन रहा.”

अभिजित रावांच्या बोलण्यातला सूर कडला होता मला. मनातच ठरवलं आता आपली डिटेक्टिव्ह गिरी सुरु करावीच लागेल तेंव्हाच सर्वांच्या मनात दडलेल्या गोष्टी मला जाणून घेता येईल आणि माझं प्रत्येकाशी नातं घट्ट करता येईल. ह्या घरात अस्तिव निर्माण करणं म्हणजे आधी प्रत्येकाच्या आयुष्यात माझी गरज आणि आपलेपणा असायला हवा. नुसतंच घरातली सून म्हणून राहण्यापेक्षा मी ह्या घराची भक्कम अशी आधार स्तम्ब व्हायला हवी.

सकाळी मला जरा गरगरत होत तरीही माझी सगळी कामे आटपवुन मी मॅडम कडे जाण्याच्या तयारीला लागले होते तेवढ्यात दीर अमित माझ्या खोलीत सरळ शिरला आणि मि त्याच्याशी बोलावं हा अट्टहास करू लागला. मला आधीच त्याचं वागणं कधीच पटत नव्हतं. मग मी काय करावं हे सुचतच नव्हतं. तेवढ्यात माझ्या सुगरण सासूबाई माझ्यावर स्वयंपाक घरातून ओरडायला लागल्या आणि मी माझ्या खोलीतून पळत त्याच्या समोर जावून उभी राहिले. ह्या सगळ्या विचारांमध्ये सकाळी सासऱ्यांच्या भाजीत नमक आणि तेल जास्तच पडलं होत माझ्या हातून. सासू सुगरण आणि गुणाची खान असली कि सुनेची काय गत होते हे वेगळं काय सांगायचं तुम्हाला. गुमान गुपचूप ऐकत विचार करत होते कि इथे माझी डिटेक्टिव्ह गिरी कशी कामात येईल.

संघ्याकाळी मी जरा शीतलच्या मदतीने चांगलीच तयार झाले. मलाही खुप आदर होता Phd च्या मॅडम बद्दल. त्या काळात एक Phd स्त्री असणं खुपच सन्मानाची बाब होती. त्या एकट्याच मुलासोबत राहतात हे मला ह्यांनी सांगितलं होत. मलाही उत्सुकता होतीच एवढ्या कर्तबगार स्त्रीला भेटण्याची. त्यान्च्या घरी पोहचेपर्यँत अभिजीतरावांच्या सूचना काही संपत नव्हत्याच. आणि मी गुमान लहान मुलासारखी मान हलवत होते.

अरे… सांगता सांगता भाग जरा मोठाच झाला .. असो , मी नंतर घरातच सिक्रेट डिटेक्टिव्ह म्हणून काम करायला लागली होती. थोडीशी स्वतःच्या मस्तीत रमायला लागली होती. माझी डिटेक्टिव्ह गिरी मला कुठे पोहचवते आणि मॅडमच्या घरी काय घडत जे माझं आयुष्य कसं बदलत हे वाचायला विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या भागात.

——–पुढचा भाग पेज वर लवकरच ..दोन दिवसांनी तोपर्यंत Stay in touch

शुद्धलेखनाच्या चुका माफ करा.

© उर्मिला देवेन
urmiladev@gmail.com

लेख आवडला असेल तर माझ्या नवीन लेखासाठी like किंवा फॉलो करा 
तुमच्या प्रतिक्रिया मला नेहमीच प्रोसाहन देतील.

अधिक लेख/कथा तुम्ही इथेही वाचू शकता http://www.urpanorama.com/मराठी-ब्लॉग्स/

सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव.

फोटो आभार गुगल

Facebook Comments

You may also like...