द इंस्पिरेशन स्टार्ट हिअर… हॅपी वुमेन्स डे!

“वहिनी, आज बाहेर खाणार आहे ग मी, आज जरा प्लानिंग आहे वुमेन्स डे ला काही करायचं त्याची, आज टिफिन नको ग.” “अग सारखं काय बाहेर खातेस, गेल्या चार दिवसापासुन काही ना काही आहे तुझं.” “वहिनी, वुमेन्स डे वीक सुरु आहे, ऑफिस मध्ये मज्जा असते, अवार्ड फंगशन आहे आज. आणि नंतर आम्ही वुमेन्स डेला आम्हीं साऱ्या …

तिळगुळ घ्यायला या!

नववर्षाचा उत्साह जरा उतरला, काय करायचं काय नाही हे ठरवून झालं आणि नवीन वर्षाच्या पहिल्या सणाने दस्तक दिली, सुंदर सुंदर भेटीच्या वस्तू, हळदी कुंकवाचे भांडे, सजावटीच सामान बाजारात बघून तिच्या अंगाला काटे आले होते. लहानपणीचे ते निरागस दिवस आठवत होते, मैत्रिणींसोबत वाणासाठी हिंडणं आणि गेम खेळत आवडती वस्तू उचलणं , मग जरा रुसणं आणि तिळाचा …

हो आई, इथे सगळं ठीक आहे…

घरातल्या कामाच्या गडबडीत रेणूला, तिच्या आईला फोन करण्याचा राहून गेलेला. तिच्या मुलीला सुट्टी होती  आणि नवरा अनिकेश उशिरापर्यंत घरी येत असल्याने, सासऱ्यांचही तिलाच बघावं लागत होतं. ते आजारी होते महिनाभरापासून. आणि सासूच्या डोळ्यांनी कमी दिसत होतं मग त्याही कामात मदत आणि सासऱ्यांची काळजी हवी तशी घेवू शकत नव्हत्या. नणंद राणीही दिवाळीच्या सुट्टीत मुलांना घेवून काही …

“द प्राईड….” तू माझाच ना ?

“ताई मी निघाले, उद्या यायला जरा उशीर होईल.” मंदा दारात चपला घालतांना म्हणाली “अगअग, जरा हळू, पडशील.” तिथेच बसून पेपर वाचत असणारा राजन तिला म्हणाला. “साहेब, घाईत आहे, निघते.” मंदा दार उघडत म्हणाली आणि झपझप पायऱ्या लांघात खाली गेलीही. पेपर सोडून राजन तिच्या मागेच दारापर्यंत गेला, ती कुठवर गेली हे पाहत हो जरा दाराच्या बाहेरही …

आवंढा…

आशिष येण्याची वेळ झाली होती, अरुणाने चहा ठेवला आणि ती जरा बैठक आवरत होती, जरा गरगरलं, तिने लक्ष दिलं नाही. आता ती झाडू हातात धरायला गेली पण तिला झाडू दोन-दोन दिसायला लागले. डोळ्यासमोर बोंगाडे कोळी नाचत होते तरही सवयी प्रमाणे लक्ष न देता डोळे चोळत तिने झाडू पकडला. आता मात्र जास्तचं गरगरलं. तिथेच डायनींगची खुर्ची …

द फ्लोटिंग प्रीझन…एक सत्य कथा …

ही कथा विश्व मराठी परिषदे कडून जगभरात घेण्यात आलेल्या COVID-19 स्पर्धेत, वेदिशी मराठी गटातून उतेजानार्थ दुसरा क्रमांक घेवून विजेती आहे. शिवाय हि कथा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळा विषय म्हणून गौरवल्या गेली आहे. एक सत्य कथा … जपानच्या योकोहामा शहरातून डायमंड प्रिन्स नावाच्या इंग्लडच्या जहाजाने त्याचा प्रवास साधारण एक महिन्या आधी सुरु केलेला. परतीच्या पंधरा दिवसात …

मग चंडी व्हावंच लागतं…

सानिका रोज ऑफिस संपवून घराकडे निघायची, आज जरा ऑफिस मध्ये दुर्गापूजा होती सगळा निवांत होता, घरी आईला फोन केला, “आई मला जरा यायला वेळ होईल, तरी आठपर्यंत पोहचते. नवरात्रीचे दिवस आहेत सगळीकडे धाम धूम असतेच, काळजी करू नको.” साधारण ७ वाजता सानिका निघाली, बसची वाट बघत होती. समोरून येणारी बस भरून आली पण घरी वेळेत …

सूनबाईचा बायोडाटा!

सुहासिनी आज मुलींचे फोटो घेवून बसली होती, लग्न जुळवून आणणारे माधव काका आले होते ना! सुहासिनीचा तोरा असा कि तिला तर तिच्या मुलासाठी, मुलगी दिसायला विश्व सुंदरी हवी होती, वागणुकीने शांत, संस्कृती जपणारी, मोठ्यांचा मान ठेवणारी, मुख्य म्हणजे शिकलेली, आणि घराण्याला शोभणारी . खेड्यातली मुलगी नकोच असा शब्दच होता तिचा, का तर म्हणे तिला राहणीमानाचा …

आता तुला काय सांगू…

दुपारची वेळ होती, ममता तिच्या बहिणीला फोन करायला लागली, लहान बहीण मनू, तिची लहान मुलगी आजारी होती, असं कळालं होतं ममताला. ममता नावाप्रमाणे मायाळू, सालस, सतत सभवतालच्या लोकांची काळजी घेणारी. दुपारच्या निद्रेनंतर तिचा वेळ सर्वांची चौकशी करण्यात जायचा. हा .. हे मात्र खरं, तिला कुणी स्वतः हुन फोन करत नव्हतं. कुणाला फोन लावला कि समोरचा …

‘मोनिका’ ….द वूमनहूड -अंतिम भाग

पहिला भाग http://www.urpanorama.com/13714/ दुसरा भाग http://www.urpanorama.com/13719/ तिच्या डोळ्यावर टोर्च चा प्रकाश पडला आणि तसाच तिचा कुणीतरी हात धरला, जरा सावरलीच तर तिला कुणीतरी थोपकाडीत दिली, ती खाली पडली, जरा चेहऱ्यावरची केसं सावरत ती बघायला लागली, समोर माधवराव उभे होते , “मला वाटलच होतं तू असं काही करणार म्हणून, मी पराहाच देत होता. पळून जातेस काय …

‘मोनिका’ ….द वूमनहूड -भाग २

पहिला भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13714/ तिच्यात हरवलेला आणि हादरलेला अंकित मनातून कावरा बावरा झाला होता. काहीच त्याला सुचेना, त्याने तिच्या हातातून त्याचा हात काढला. उभाच झाला, “तू काय बोलती आहेस. नाही नाही . “”नाही काय म्हणतोस, नाही च हो करायला आली आहे मी.” ती त्याच्या कडे बघत होती आणि तो अडचणीत आल्यासारखा हरवला होता. दोघांत …

‘मोनिका’ …. द वूमनहूड.

आज दहा वर्ष झाली होती मोनिकाला गावातल्या शाळेत काम करतांना. इंजिनिअरिंगची डिग्री असूनही गावातल्या शाळेत सायन्स आणि गणित शिकवायची. गावात मान होताच तिला. गावातल्या शाळेत शिकतांनाही ती नेहमी एक फरक सहज टीपायची. शाळेतल्या मुला मुलींमध्ये स्वतः आईवडिलांकडून होणार प्रेमाचा भेदभावही नजरेतून सुटत नव्हता तिच्या. सगळं सुरळीत सुरु होतं तीच घरात आणि गावात एवढी रुळली होती …

माझं छोटंसं आभाळ…अंतिम भाग

पहिला आणि दुसरा भाग http://www.urpanorama.com/13569/ तिसरा भाग इथे वाचा http://www.urpanorama.com/13638/ मनोज ने ताडनक ईशाच्या माहेरी फोन लावला, चिडचिडत सर्व सांगितलं, ईशा गुमान पलंगावर बसून होती, जणू मनात एक सुप्त ज्वालामुखी धकधकत होता पण फुटत नव्हताच.  मनोजने त्याच काम केलं होतं, घरात पार शांतता होती, मधेमधे त्याला एक झटका यायचा आणि तो परत रागाने तीलमिलत  ईशाची …

माझं छोटसं आभाळ…भाग १ आणि २

शारूला सुधीर पिकअप करायला कॉलेज मध्ये आलेला, गेटच्या बाहेर तो स्वतःचा गॉगल डोळ्यावर घालून बाईकच्या आरश्यात डोकावत मटकत होता. येणाऱ्या जाणाऱ्या कॉलेजच्या मुलीनांहि टापा टापी सुरु होती.  मुलीही त्याला बघून हसत होत्या. सुरु होतं त्याचं टाईमपास करणं. त्याच्या त्या उंच धिप्पाड आणि गोऱ्या रंगावर तो काळासा गॉगल जणू गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा …

इथे मीचं फक्त तुझा आहे.

लग्न झालं आणि सर्व कसं बदललं होतं, साडी कधीही न घालणारी साडी घालत होती. आईने बजावलं होतं, घरचे म्हणे पर्यंत सलवार घालायचा नाही, डोक्यावर पदर घ्यायचा. नजर खाली ठेवून बोलायचं, प्रत्येक गोष्टीला हो म्हणायचं. सगळं काही लतिका पाळत होती. जर नवरीचे चार दिवसं नवलाईचे जगावे आणि इथल्या लोकांच्या  मनात शिरावं म्हणून तीही सगळं मनापासून करत …

मी आधुनिक सावित्री आहे.

आराध्याची पाहिलं वटपौर्णिमा, घरात अगदीच सुंदर वातावरण, सासू तशी खमक्या स्वभावाची पण चालवून घेणारी कारण सून लाडाची होती तिच्या. अनिकेश तिला लग्नाच्या तब्ब्ल १५ वर्षाने झालेला. मग त्याचंच लग्न सर्व घराण्यात उशिरा झालेलं. सासू प्रत्येकाच्या सुनीच कौतुक बघून होत्या आणि आता तिच्या सुनेची पहिली वटपौर्णिमा येवून ठेपली होती. आराध्या पेक्षा सासूलाच नवल होतं सुनेच्या पहिल्या …

आणि मग स्वतःलाच बळ आणावं लागतं

किती ना ही अद्भुत रचना त्या रचनाकाराची….? स्त्रीला रडण्याची कलाही अवगत आहे. अश्रू पडत नसले तरी मन ओक्साबोक्शी रडत असतं. अरुंधती आज पलंगावर त्राण नसलेलं शरीर घेवून पडून ओक्साबोक्शी अशी रडत होती पण आवाज फुटत नव्हता. आवाजही कंठात कोंबला होता. आशेची किरण दिसत नव्हती, कसं होणार पुढे म्हणून बरसत होत्या विचारांच्या धारा, कळकळत होत्या भावनांच्या …

रंग गुलाबी तुझ्या माझ्या नात्याचा.

लग्नाला १० वर्ष झालेली मानसी आज स्वतःला आरश्यात बघून जरा नाराज होती, मग दुपारी तिने जुना अल्बम काढला आणि स्वतःचे फोटो बघत राहिली. चार वाजता तिची मुलगी साक्षी घरी आली आणि तीही तो जुना मम्माचा अल्बम बघायला लागली. आणि लगेच मम्माचा लहानपणचा फोटो बघून ओरडली, “अरे .. मी तर हुबेहूब अशीच दिसते,” मग तिने प्रत्येक …

ओ वुमनिया….हमसे है दुनिया सारी … वुमन्स डे स्पेशल

ती जननी, तीच पालन करणारी. ती सुरुवात, तीच जगाची उद्धरणी. ती प्रेम, तीच सर्वाना सोबत घेणारी. ती दिशा, तीच मार्ग दर्शवणारी. ती सर्वस्व  हरून.. आयुष्यात बाजी मारणारी. ती स्त्री…………आणि ती मी … मग खरं आहेना! हमसे है दुनिया ये सारी…हम दुनियासे नाही…. “कसला हा वूमन डे?  काम कमी तर होत नाहीत ना बायकांची… ? आणि इथे …

स्त्री…. जेव्हा तू मुक्त होशील!

स्त्री…. जेव्हा तू मुक्त होशील.. स्त्री पुरुष समानता जेंव्हाही बोलल्या जाते तेव्हां तेव्हा माझ्या मनाला एक सल लागते. ती जरा वरची स्टेप वाटते मला.. आता तुम्ही म्हणालं हे काय. पण खरं आहे स्त्री पुरुष समानता समाजात रोवण्याआधी स्त्री मुक्त व्हायला हवी तिच्या आखलेल्या चौकटीतून.  स्त्री मुक्ती वर बोलणाऱ्या कहीदा स्वतःच्या चौकटीतच अडकून बसतात. आणि मग …

लायकी….लेट्स प्रूव्ह इट!!!

“ये जास्त बोलू नको, आणि हे असले चोचले चालायचे नाही हा माझ्या घरात, आणि काय ग तुझ्या माहेच्यांची एवढी पण लायकी नाही का कि ते तुला आणि मला जरा ढंगाचे कपडे घेतील. नाही मुलीचा काही अधिकार असतो कि नाही. कायद्याने असतोच ना! तो मागू नये म्हणून तरी सर्व कसं थाटात मुलीचं करतात लोकं एवढं पण …

आणि मी जगायला शिकले…

अचानक राधिका काकूने फोन केला, “काय ऐकते आहे मी?  तू म्हणे…. सासूला साड्या धुवायला लावतेस, शोभतं का तुला…? किती सहन केलंय ग तुझ्या सासूने…? खूप रडत होत्या त्या, सुमन सांगत होती.  मला बाई फारच वाईट वाटलं…. तुझ्या कडून अशी अपेक्षा नव्हती हा मला. स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणजे क्या स्वतःला राणीच समजतेस काय?” स्मिता गोड …

पती-पत्नी….कभी प्यार तो कभी तकरार… व्हॅलेंटाईन डे स्पेशल…

सादर लेखाचे पहिले व्हर्जन दोन वर्षाआधी मॉम्सप्रेसोवर प्रकाशित झाले होते(पती पत्नी- कधी दोस्त तर कधी दुश्मन ) त्यानंतर सादर लेखाचा इंग्रजी अनुवाद आंतरराष्ट्रीय स्थरावर पारितोषकासाठी नामंकित झालेला होता.  मराठीचा लेख आजही विविध ग्रुपवर आणि वॉट्स अप वर विनानावाने फिरतोय हि खंत आहे. तसेच काही लेखकांनीही स्वतःच्या नावाने प्रकाशित करण्याची चुकी केलीली आहे. प्रतिलिपी आणि मोम्स्प्रेसो …

एक कोहिनूर सर्वांमध्येच असतो.

साधनाच लग्न झालं आणि संसारत रमत गेली, वर्षा मागून वर्ष जात दहा वर्ष झाली, मुलगा मुलगी घरात अगदीच गोकुळ नांदत होतं. सासूच्या शिस्तेत अगदीच तयार झाली होती. रमत रमत स्वतःला गमावलं होतं. कधीकाळी स्वतः चकाकण्याचा प्रयत्न आता संपला होता. कुणीतरी यावं आणि मला मदत करावी, माझ्या कार्याला मान द्यावा हि भावना तिच्यात जन्माला आपसूकच आली …

तू तुझी जवाबदारी आधी आहेस !

मानसीच बालपण अगदीच बालपणीच्या हट्टात गेलं होतं. वडिलांची लाडकी, भावाला प्रिय, आणि आईचा जीव होती. लहान होती तेव्हा आईबाबा सतत सोबत असायचे. हवं नको ते प्रत्येक स्वतः जवाबदारीने बघायचे. एकदा शाळेत खेळतांना पडली आणि रडतच घरी आली. आईबाबांना शाळेतील मुलांचं नाव सांगून रडत होती. बाबानी समजावलं, “बेटा, जरा सांभाळून खेळायचं, आणि हे असं प्रत्येकाला दोष …

मीठ मात्र सर्वांकडे असत!!

मीठ मात्र सर्वांकडे असत!!

अनघाच्या लग्नाला जेमतेम सहा महिने झालेले, जरा रुळायला लागली होती तरी फारशी खुलली नव्हतीच.  अनघाला घरात नौकरी करण्यासाठी नकार होता, पण तीला करायची होती.  कस समजवावं घरच्यांना हे तिला कळतच नव्हत. पण घरच्यांच्या संमतीशिवाय काही करायचं नाही हेही तीच ठरल होतच. सुरु होते प्रयत्न … त्या दिवशी सहज विचार मग्न घरात एकटीच होती तर  काकु …

द सक्सेसफुल वुमन – अंतिम भाग.

आधीचे दोन्ही भाग WEBSITE वर आहेत. चित्राला लीड मिळाली नव्हती तरीही ती खुश होती कारण सक्सेस हे कष्टाने मिळत हे कटू सत्य तिला गवसलं होतं. पण स्वतःच्या हक्कासाठी लढाव लागतं हेही ती जाणून होती. यश कुठल्याही मार्गाने जवळ करता आलं असलं तरी अस यश तात्पुरत असतं असा तिचा ठाम विश्वास होता. आणि सक्सेसफुल होण्यासाठी अनुभवाची …

द सक्सेसफुल वुमन- भाग २

चित्रा राजेश सरांना भेटायला गेलेली, टेक्निकली काही गोष्टी फक्त चित्राचं सांगू शकत होती म्हणून राजेश सरांनी तिला तातळीने बोलावून घेतलं होत. फॉरेन क्लायंटला समजून आणि समजवण्यात कसोटी लागली होती दोघांची. आणि तिथेच तिला कळल कि हा प्रोजेक्ट सनया लीड करण्याचे चान्सेस आहेत. “सर, ठीक आहे, मला काही फरक पडत नाही, सक्सेसफुल होण्यासाठी नुसत प्रोजेक्ट लीड …

द सक्सेसफुल वुमन- भाग १

चित्राला आज ऑफिसमध्ये पोहचायला उशीर झाला होता. कारणही तसच गोड होत, छोट्या मुलाचं मुडच असत कधी कधी. आज तिची छोट्शी तीन वर्षाची सना आजीकडे राहायला तयार नव्हतीच. मग मम्मा चित्राला जरा वेळ तिच्यासोबत घालवावा लागला आणि गोडीगुलाबीने सनाचा होकार मिळताच ती लगबगीने ऑफिस साठी निघाली होती. नेमकी तिच्या नवऱ्याची मिटिंग लवकर होती मग तो आधीच …

…आता मी “नाही” म्हणायला शिकले

दिवाळीचा सण जवळ होता, मला खूप काम होती, कामाचं लोड खुप होत, सगळं मलाच करायचं होत. दिवाळीचा फराळ, खरेदी, घर सजावट सगळं प्रत्येकाच्या आवडी निवडी जपून मॅनेज करणं सोपं नव्हतंच. सगळंच नीट व्हायला पाहिजे असच वाटत होत. सासरे म्हणाले मला खुशखुशीत चकल्या हव्यात. सासू म्हणाली शुगर फ्री काहीतरी बनव. मुलांचा धिंगाणा घरात चालूच होता. मी …

संसाराचं गीत गुणगुणतांना…(सासुरवाडी मी आले….)

संसाराचं गीत गुणगुणतांना … खूप जपावं लागतं स्वतःला … आणि समोरच्या प्रत्येक नात्याला … सकाळचे ९ वाजले होते तरी साक्षी झोपून उठली नव्हती. सुरेश तिच्या त्या चेहल्यावर पडणाऱ्या लटा आणि बिनधास्त झोपण्याच्या पद्धतीला बघून पार घायाळ झाला होता. तिला उठवावंसं वाटलंच नाही त्याला. तिथेच जवळ लॅप टॉपवर काम करत बसला होता. साक्षीची रिसेप्शन नंतरची पहिली …

दुसऱ्यांच्या नुसार जगणं सोडलं मी आता…

“नुकतंच लग्न झालं होतं माझं. जरा चंदेरी दुनियेत सोनेरी थाटात रमत होते. चालू होती कसरत….. मन जिकंण्याची. सासूला माझं जीन्स घालणं आवडत नव्हतं तर आज्जी सासूला माझं कुणाशीही बोलणं. आत्याला माझं मनमुराद हसणं खटकायचं तर ह्यांच्या मामीला सहज पटेल असं उत्तर देणं पचत नव्हतं. पण…मी तर मिशनवर होते. प्रेमविवाह होता ना.. ! प्रेमाने जिंकावं सर्वाना …

जेव्हा ती चंडिका होते!

त्या दिवशी ऑफिस मधून निघायला शांताला उशीरच झाला होता. साधारण रात्रीचे ९ वाजले असतील. ऑटोतून उतरून ती घराकडे जाण्याऱ्या रस्त्यावरून आपल्याच नादात चालली होती. अचानक मागून सायकल वर येणाऱ्या एका तरुणाने तिच्या शरीराच्या मागच्या भागाला घाणेरडा स्पर्श केला आणि निघून गेला. तिने त्याला रागातच म्हटलं “थांब, तुला आया बहिणी नाहीत का?”, तो कसला थांबतोय, जराही …

पण तिने बहरण कधीच सोडलं नाही…

निसर्ग किती गोष्टी सांगू पाहतो आपल्याला. ऋतू येतात आणि निघून जातात पण खूप काही सांगण्याच्या प्रयत्नात नेहमीच असतात. आपण आपल्याच नादात जगत असतो. आता चाफाच बघाना, बिचारा एकटाच बहरत असतो. त्याचा सुगन्ध दूरवर पसरलेला असतो. खोडं खडबडीत झालेले असतं. अगदीच बुंध्यावर दिमाखात डोलत असतो, कुणीही नसतं त्याच्या आसपास. तो जेव्हा पूर्ण बहरतो, तेव्हा तो आनंद …

बहीण नावाचं माहेरपण….

जानवी गेल्या सहा महिन्यापासून माहेरी गेलेली नव्हती. आईच्या दागिण्यावरून जरा खटकलं होतं वहिनीसोबत तीच. आई देवाघरी गेलेली मग रोज असा फोनही नसायचा. मनातल्या मनात काहीशी चुकलेली असायची. कधी ती स्वतःला बरॊबर समजत होती तर कधी वहिनीला, वाहिनीने आईचे दागिने मोडून तिच्या आवडीचे केलेले होते जे तिला पटलं नव्हतंच. मग काही न बोलताच तिने वाहिनीशी बोलणं …

संसार मांडते -अंतिम भाग

कथेचे सर्व भाग पेजवर आणि वेबसाइट वर आहेत. मी तर हे सगळं ऐकून हादरूनच गेले होते. आता कुठे दिराच्या वागण्यातला वेगळेपण लक्षात आल होत. कशी बशी सावरत माझ्या खोलीत आलेच तर सासूबाईने परत आवाज दिला आणि दिरांच्या खोलीत बोलावलं. मी मनातून घाबरलेच होते खोलीत जातांनाही. पण त्यानीं माझ्या हातात पेढ्याचा डब्बा ठेवला आणि म्हणाल्या ह्यातला …

संसार मांडते -भाग २

माझ्या हातून सगळंच निसटल्या सारखं झालं होत. लागलीच आई वारली आणि भाऊ दूरच्या शहरात नौकरी साठी गावाकडील सगळं विकून निघून गेलेला. माझं वाटणाऱ्या परक्या घरात स्वतःला शोधत होते मी. नवऱ्याचंही वागणं तुटक होत होत. एक भावना शून्य व्यक्ती सारखी काम करणारी मशीन म्हणून घरात फिरत होते. उठ म्हटलं कि उठ आणि बस म्हटलं कि बस. …

संसार मांडते -भाग १

“हॅलो, हा बेटा, मी आई बोलते, सगळं बॅग मध्ये भरलंस बरोबर, मॉरिशसला जातंय तुम्ही .. जरा.. सगळं जपून.” “आणि दोघेही एकमेकांच्या आवडी निवडी जपा. तुला नवीन काय सांगायचं, तू आरुषला ओळखतेसच, पण लग्नानंतर परत नव्याने त्याला ओळखण्याचा प्रयत्न कर. आधीचा आरुष आणि लग्नानंतरचा खुप फरक असणार आहे. आणि आता तू त्याची प्रियसी नाहीस, लग्नाची बायको …

ती मधुचंद्राची रात्र……अंतिम भाग

पहिला भाग आणि दुसरा वेबसाइट वर आहेत  समीरला खोलीत न बघून ती जरा गोंधळली होती. स्वतःला शांत करत आवरत होती तोच सासू खोलीत शिरली आणि म्हणाली, “ऋतुजा अंघोळ कर आणि देवघरात ये .. बोलायचं आहे तुझ्याशी” बोलतांनाही तिच्या शरीरावर कुठे जखमा दिसत आहेत का ह्यावर  त्यांची नजर होतीच. शाश्वती होताच तिने सुनेच्या डोक्यावर हात ठेवला आणि खोलीतून …

ती मधुचंद्राची रात्र……भाग १

व्हर्जिनिटी एक कडू सत्य !!! कालांतरापासून चालत आलेले. कळलेलं… न कळलेल . कळून मनात रुतलेल. अविश्वासच बीज रोवणार पहिल्या रात्रीच भयाण सत्य !!! जे आजही समाजात आहे… मनात आहे …तोंडात आहे … नात्यात आहे …भ्रमात आहे …वास्तवात आहे … कुठेतरी दूर कुणीतरी हुंदके देत असत. स्वतःच्या शुद्धपणाची अग्निपरीक्षा देत असत. काळ बदलला…. तो बदलला ती बदलली…. …

माझा फिटनेस फण्डा…. चाळीशीच्या उंबरठयावर ..

मी चाळीशीच्या उंबरठ्यावर … वजन कमी करणं हे स्वतःच्या विश्वासावर असतं.. सर्वानीच ते करावं असंही नाहीच.. जो जसा आहे त्याने तसंच स्वतःवर प्रेम करावं ह्या मताची मी आहे. मला जे आवडत ते मला करायला आवडतंच मग त्यात स्वतःला चाळीशीच्या उंबरठयावर फिट ठेवणंही आलंच.. माझ्याच काही टिप्स शेअर करते आहे बघा पाटल्या तर ..चाळीशीत पाय ठेवताच …

लग्नानंतर नौकरी- एक चॅलेंज

दहावी बारावीची टॉपर वसुधा, इंजीनियरिंग मधेही रँक, डायरेक्ट कॅम्पास सिलेक्शन झालं होत तीच, भयंकर तेज, तिखट स्वभावाची, लाथ मारेल तिथून पाणी काढणारी, चार वर्षात सॉफ्टवेर कंपनीत राहून सिनियर पदावर पोहचली होती. दिसायला जेमतेम पण तयार झाली कि हमखास लोकांच्या नजेरीत येणारी. तिच्याशी लंग्न करणाऱ्यांची रांग लागली होती. लग्न ठरलं आणि सिनिअर कंसल्टंटचा जॉब सोडून नवऱ्याबरोबर …

राणीची एंट्री… शुभमंगलम सावधान!!! (अंतिम भाग)

आणि अंतिम भाग …………….. नेत्राला आता बाळाची ओढ लागली होती. काही फॉर्मेलिटीज असायच्या मग तिला अनाथ आश्रमात जावं लागायचं. पण जेव्हाही ती तिथे जायची, त्या आंधळ्या मुलाची आणि तिची भेट हमखास होत होती. त्याचा निरागस आणि शांत पणा कोण जाणे तिला त्याच्या कडे ओढून घ्यायचा. तिला राहवलंच नाही तर मग तिने काही कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दल विचारपूस …

राणीची एंट्री… शुभमंगलम सावधान!!! (भाग ३)

पहिल्या भागासाठी इथे वाचा  http://www.urpanorama.com/7656/ दुसऱ्या भागासाठी इथे वाचा  http://www.urpanorama.com/7672/ दोघेही घरी परत आले तेव्हा घरात सर्वंच हजर होते, पण अचानक वागणुकीत बदल हा बोचणारा असता. मग हळूहळू नीरज घरात वेळ काढून सर्वांशी बोलायचा. काही दिवसानंतर जेवणाला सुरुवात झाली असतांनाच जावई आले, नीरज ने पहिल्यांदा जावयाला बसायला खुर्ची ओढली आणि आग्रहाने जेवायला लावलं. जेवण संपेपर्यंत …

राणीची एंट्री… शुभमंगलम सावधान!!-(भाग २)

पहिल्या भागासाठी इथे वाचा  http://www.urpanorama.com/7656/  भराभर दिवस जात होती, लग्नाला सहा महिने होत आले होते आणि नेत्रा ला तिच्या पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला तिच्या खांद्यावर बाळ हवं होत म्हणून दोघान्ची दत्तक बाळासाठी हालचाल सुरु केली होती. जाऊबाई मागे लागल्या होत्या कि त्यांच्याच एका मुलाला दत्तक घ्या आणि नणंद म्हणायचि कि ती भावासाठी दुसरं मुलं जन्माला घालायला …

राणीची एंट्री… शुभमंगलम सावधान!!-भाग १

सात समुन्द्रा पलीकडे अमेरिकेच्या शिकागो शहरात, नेत्रा कंपनीच्या मार्केटिंग साठी गेली होती, तिथेच तिला नीरज भेटला, तोही तिथेच स्वतःच्या प्रॉडक्ट ची मार्केटिंग करायला आलेला.. एकाच देशाचे असल्याने बोलन सुरु झालं मग भेटी वाढल्या आणि वाढत्या भेटीचं रूपांतर मैत्रीत झालं. नेत्रा, वय ३७, मास्टर इन मॅनेजमेंट, लठ्ठ पगाराची नौकरी, घरी एकुलती एक, घरच्यांच्या नाकात अगदी दम …

मी गुढी उभारली माझ्या मनाची….

लग्नला जेमतेम सहा महिने झाले होते आणि राहुल सारखा घराबाहेर राहायचा, अनघाला घरात करमेना, राहुल अगदीच आधीसारखा वागत नाही ही तिची तक्रार सर्वांकडे सुरु झाली होती. माहेरचे सासरचे सर्वच तिला समजवायचे कि त्याला जरा जास्त काम असेल ग, तू काही काळजी करू नको. पण अनघाचं मन काही मानेना. अचानक रात्री राहुलचा फोन वाजला, आणि राहुल …

एक नवीन सुरुवात … त्याच वाटेवर .. प्रेमापोटी!!

छोटाशी सना, आजीला रागवत होती, “काय ग तुला हे सोफ्याच कव्हर नीट पण ठेवता येत नाही? सगळी काम तुला मला आज सांगावी लागतात, माझ्या आईचा गजरा आणलास का तू?  आज माझा पप्पा येणार आहे ना.” आज्जीला भारी प्रश्न पडला, हिला कसं कळलं कि आरुषीला बघायला मुलगा येत आहे ते. आज्जीच्या हातातली फुलदाणी खाली पडली आणि …

उत्तम सुनबाई होण्यापेक्षा, चांगली पत्नी व्हायला आवडेल.

“माझी सून खूप छान आहे”, असं ऐकायला मन कस आसुसलेलं असतं. कितीही प्रयत्न करा सासरच्यान कडून चुकूनही शब्द बाहेर पडत नाही. तिच्या हात तोंडावर ठेऊन हसण्याच्या सवयीने मी तिला लगेच ओळखलं. माझी मैत्रीण माधवी मला खुप वर्षांनी भेटली. तिच्या सासरच्या मंडळी सोबत, नणंदेच्या लग्नाच्या खरेदीला आली होती. ती तिच्या नणंदेला शालू पसंद करण्यात मदत करत होती. …