आज कोर्टाच्या पायऱ्या चढतांना, अचानक सुमीच लक्ष त्याच पायऱ्या आनंदाने उतरणाऱ्या एका नवविवाहित जोडप्यावर पडलं. प्रत्येक अँगलने फोटो घेत होते दोघेही. सोबत फारसं कुणी मोठं दिसत नव्हतं. मित्र मैत्रिणी दणादण फोटो घेत होते. त्या छोटाश्या घोळक्यात आनंद ओसंडून वाहत होता. आणि सुमी एकटीच होती. बघून सुमीला तिचे दिवस आठवले, तिनेही पळून जाऊन लग्न केलेलं, दोन …
